शुभांगी ढवळे यांना ‘आदर्श ग्रामविकास अधिकारी’ पुरस्काराने गौरव ♦️ग्रामीण विकास क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल

लोकदर्शन 👉उमेश राजूरकर

बाखर्डी (ता. कोरपना) पंचायत समितीअंतर्गत ग्रामविकास अधिकारी शुभांगी ढवळे यांनी ग्रामपंचायत निमणी येथे मागील तीन वर्षांच्या कालावधीत शासनाच्या विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी करून ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचविण्याचे कार्य केले. या उल्लेखनीय योगदानाबद्दल मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत जिल्हा परिषद चंद्रपूरकडून त्यांना नुकताच ‘आदर्श ग्रामविकास अधिकारी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते देण्यात आला.

या कार्यक्रमाला आमदार सुधाकर अडबाले, किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे, मीना साळुंखे, नूतन सावंत, शिक्षणाधिकारी राजेश पाताळे, अश्विनी केळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कार स्वीकारताना शुभांगी ढवळे यांच्यासोबत वडील दिलीप ढवळे, पती अविनाश गाडगे, मुलगी निधी गाडगे व मुलगा आयुष गाडगे उपस्थित होते. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

दरम्यान, कोरपना तालुक्यातील महेश एस. मरापे व पवन ए. कातकर या ग्रामविकास अधिकाऱ्यांनाही ग्रामीण विकास क्षेत्रातील कार्यासाठी गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here