बल्लारपूर आय.टी.आय.चे रुपांतर होणार ‘आदर्श औद्योगिक प्रशिक्षण केंद्रा’त! ♦️आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा ठोस पुढाकार — 15 कोटींचा निधी, दर्जेदार मनुष्यबळ घडविण्याचा संकल्प

लोकदर्शन चंद्रपूर 👆 मोहन भारती

चंद्रपूर / दिनांक 2ऑगस्ट
राज्यातील उद्योगजगतातील बदलत्या गरजा लक्षात घेता प्रशिक्षित आणि कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. यामध्ये आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांची भूमिका अग्रगण्य ठरते. त्यांनी बल्लारपूर येथील राणी हिराई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) प्रगतीचा अलीकडेच सविस्तर आढावा घेतला.

या संस्थेला आधुनिक युगाशी सुसंगत बनवण्यासाठी त्यांनी 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, संपूर्ण इमारतीचे नूतनीकरण, आधुनिक फर्निचर, उपकरणे, तसेच विद्यार्‍थ्यांसाठी आदर्श पायाभूत सुविधा उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

मुनगंटीवार यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण सूचना :
🔹 आयटीआयसाठी भव्य प्रवेशद्वार व रेडियमयुक्त मार्ग तयार करणे
🔹 रिक्त पदांची तातडीने भरती
🔹 उद्योगांच्या मागणीनुसार अभ्यासक्रम व प्रशिक्षण अद्ययावत करणे
🔹 विद्यार्थ्यांची नोकरी लागण्याची टक्केवारी मोजून अहवाल तयार करणे
🔹 सोलार टेक्निशियन, इलेक्ट्रिकल व्हेईकल मेकॅनिक, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सहाय्यक यांसारखे कोर्सेस सुरु करणे
🔹 मार्च 2026 पर्यंत नविन स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभारण्याचे लक्ष्य

या बैठकीत लाॅयड मेटल्स, सार्वजनिक बांधकाम विभाग, एसएनडीटी उपकेंद्र, तसेच आयटीआयचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. मुनगंटीवार यांनी या बैठकीत उद्योग व प्रशिक्षण संस्थांमधील सुसंवाद वाढवण्यासाठी विशेष प्रयत्नांचे निर्देश दिले.

मुनगंटीवार यांचा ठाम विश्वास:
“बल्लारपूर आयटीआय हे केवळ एक प्रशिक्षण केंद्र न राहता, महाराष्ट्रातील आदर्श, आधुनिक आणि सुसज्ज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या रूपात ओळखले जाईल.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here