लोकदर्शन चंद्रपूर 👉मोहन भारती
राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री व चंद्रपूरचे लोकप्रिय आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवसानिमित्त इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) चंद्रपूर शाखेने विशेष सत्कार आयोजित केला. यावेळी उपस्थित डॉक्टरांनी उभं राहून (स्टँडिंग ओवेशन) त्यांना सन्मान देत अनोखा भावनिक क्षण घडवून आणला.
या कार्यक्रमाला आयएमएचे अध्यक्ष डॉ. रितेश दीक्षित, सचिव डॉ. सुश्रुत भुक्ते, डॉ. स्नेहल पोटदुखे, डॉ. मोनिका कोतपल्लीवार तसेच भाजपचे महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी, “डॉक्टरांच्या हातून झालेला सत्कार केवळ वैयक्तिक गौरव नसून माझ्या समाजकार्याला मिळालेलं प्रेम आहे. डॉक्टर हे केवळ व्यवसायिक नाहीत, तर जीवनदाते आहेत. त्यांच्या हातून मिळालेला हा सन्मान मी आयुष्यभर हृदयात जपेन,” असे भावनिक उद्गार काढले.
“डॉक्टरांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. त्यांच्या सेवाकार्यात माझं योगदान असणं हेच माझ्यासाठी खऱ्या अर्थाने सन्मान आहे,” असेही ते म्हणाले.
IMA चंद्रपूरने दिलेला हा सन्मान आमदार मुनगंटीवार यांच्यासाठीच नव्हे तर जनसेवेच्या त्यांच्या दीर्घकालीन कार्यपद्धतीचा सन्मान ठरला, असे मत अनेक डॉक्टरांनी यावेळी व्यक्त केले