महसूल सप्ताह २०२५ ला कोरपन्यात उत्साहात सुरुवात — महसूल दिनानिमित्त आरोग्य तपासणी, सन्मान व जनहित कार्यक्रमांची रेलचेल

लोकदर्शन👉धनराज सिंग शेखावत

कोरपना (ता. १ ऑगस्ट २०२५)
दरवर्षीप्रमाणे १ ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त राजुरा उपविभागांतर्गत दिनांक १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत महसूल सप्ताह २०२५ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे.

महसूल सप्ताहाचा उद्घाटन कार्यक्रम आज कोरपना तहसील कार्यालयाच्या सभागृहात तहसीलदार पल्लवी आखरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यानंतर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान, तसेच लाभार्थ्यांना विविध योजनांतील प्रमाणपत्रांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

📅 महसूल सप्ताहातील महत्त्वाचे उपक्रम

🔸 २ ऑगस्ट — अतिक्रमण नियमन प्रक्रियेस पात्र कुटुंबांना पट्टे वितरण व आढावा बैठक, उपविभागीय कार्यालय राजुरा येथे उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार.

🔸 ३ ऑगस्ट — गावांमध्ये पांदन रस्त्यांचे नियोजन व दुर्तफा वृक्षलागवड मोहिम.

🔸 ४ ऑगस्ट — छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान मंडळ गावांमध्ये राबविण्यात येणार.

🔸 ५ ऑगस्ट — विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन व मॅपिंगसाठी घरभेट मोहीम, आणि पंचनामे करण्यात येणार.

🔸 ६ ऑगस्ट — शासकीय जमिनीवरील अतिक्रमण व शर्तभंग प्रकरणांचे निराकरण, दोषींवर कारवाई.

🔸 ७ ऑगस्ट — M-Sand धोरणाची अंमलबजावणी, नविन एस.ओ.पी. अनुसार कार्यप्रणाली पूर्ण करणे व महसूल सप्ताहाचा समारोप समारंभ.

तहसीलदार पल्लवी आखरे यांनी सांगितले, की महसूल सप्ताह हे फक्त औपचारिक कार्यक्रम नसून, जनतेच्या थेट सहभागातून प्रशासन व नागरीक यांच्यातील विश्वास दृढ करणारा उपक्रम आहे.

✍️ बातमी — लोकदर्शन सकारात्मक लोकजागर
(आपल्या लोकहिताच्या प्रत्येक कृतीचा सकारात्मक दस्तऐवज)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here