विदर्भ तेली समाज महा‌संघ चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणीची सभा संपन्न

By : Shankar Tadas 

चंद्रपूर : 

28 जुलै २०१४ रोजी विदर्भ तेली समाज महासंघाच्या चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणीची सभा चंद्रपूर येथील संताजी सभागृहात पार पडली. चंद्रपूर जिल्हयातील १५ ही तालुक्यातील महासंघाचे पधाधिकारी, सदस्य व निमंत्रित अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजाची सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक समस्यावर चर्चा करव्यात आली.

चंद्रपूर जिल्हयात तेली समाज सर्वात मोठ्या संख्येने असून समाजाचे राजकारणात प्रतिनिधीत्व दिसून येत नाही यावर चर्चा करण्यात आली. समा‌जातील जिल्हयात शिक्षण घेण्याऱ्या युवकांच्या समस्या, मोठ्या प्रमाणात वाढणारी बेरोजगारी याच्यावर चर्चा करन्यात आली. राजकिय पक्षांनी येणाऱ्या निवडणूकीत तेली समाजाला प्रतिनिधत्व दे‌न्याबाबतचा ठराव घेण्यात आला.

सभेच्या अध्क्षस्थानी विदर्भ तेली समाज महासंघाचे केंद्रिय मार्गदर्शक जेष्ठ विधिज्ञ अँड विजय मोगरे होते, त्यांनी समाजानी संघटित होऊन काम करावे सर्व राजकीय पक्षांनी समाजाची दखल घ्यावी असे सांगितले,
विदर्भ तेली समाज महासंघचे केंद्रीय उपाध्यक्ष डॉ विश्वास झाडे यांनी समाजातील सर्व घटकानी एकत्रित यावे. आणि समाजाशी बांधीलकी राहून समाजाला सर्वोपरी मदत करील असे सांगितले.

नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रा डॉ संजय बेले यांनी विदर्भ अध्यक्ष मा. राघूनाथजी शेंडे व संपूर्ण केंद्रिय पदधिकारयांचे नियुक्त केल्याबद्दल आभार मानले. समाजातील वर्तमान संघटन व समाजाची प्रत्येक क्षेत्रातील मागासलेपणा दूर करण्यासाठी प्रयत्न केले जाईल व समाजाला दिशा देण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून करन्यात येईल असे सांगितले.
सभेला नवनियुक्त कार्यध्यक्ष डॉ. नामदेवराव वरभे यांनी प्रास्ताविकेतून महासंघाची भुमिका स्पष्ट केली. मंचावर शहराध्यक्ष अभय घटे, महिला आघाडी प्रमुख चंदाताई वैरागडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनाक्षीताई गुजरकर उपस्थित होते तसेच चिमूर येथून श्री ईश्वर डुकरे, वरोरा येथुन श्री टिपले, श्री पिसे, भद्रावती येथून श्री मोते, घुघुस चे सोनल भरडकर, राजूरा मधून श्री पुरुषोतम गंधारे, बल्लारपुर येथून श्री खनके, घुबडे, कोठारी येथून श्री सतीश बावने, मुल येथुन श्री चलाख, शैलेश जुमडे, विकास घटे, ऍड प्रवीण पिसे, जितेंद्र इटनकर, सौ. छबुताई वैरागडे, ऍड. वामनराव खेडकर, सुवर्णा लोखंडे, अँड रमेश टिकले, श्री मनीष खनके, अँड विजय हजारे, डॉ प्रसाद पोटदुखे ऍड अनिरुद्ध टिकले, दिक्षांत बेले, भूषण देशमुख, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here