ग्राहकांच्या प्राप्त तक्रारीचे निराकरण करा : जिल्हाधिकारी विनय गौडा

By : Devanand Sakharkar 

चंद्रपूर : प्रत्येक विभागास प्राप्त होणाऱ्या ग्राहकांच्या तक्रारीचे तात्काळ निराकरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सर्व विभाग प्रमुखास दिले. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची मासिक बैठक आज (दि.25) जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आयोजित करण्यात आली होती.

बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी अजय चरडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, अन्न धान्य वितरण अधिकारी सुमेर चवरे, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, बी.एस.एन.एल. चे सहायक महाप्रबंधक राजेश शेंडे यांच्यासह जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेमधील सदस्य तथा अशासकीय सदस्यांची उपस्थिती होती.

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेस प्राप्त तक्रारीबाबत केलेल्या कार्यहवाहीचा तथा सद्यस्थितीचा जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी आढावा घेतला. ते म्हणाले, शेतीसाठी लागणाऱ्या बियाणे तसेच शेतउपयोगी साहित्य खरेदीचा सध्या काळ असून यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, या दक्षता घ्यावी. कृषी केंद्रामार्फत शेतकऱ्यास बोगस बियाणे विक्री झाल्यास शेतकऱ्यांस नुकसान भरपाई देण्यात यावी. परंतू बोगस बियाणे तयार करणाऱ्या कंपनी विरोधात संबंधित पोलिस स्टेशन अंतर्गत तक्रार नोंदविण्यात यावी. तसेच शेतक-यांच्या प्राप्त होणा-या तक्रारीनुसार कृषी विभागाची मदत घ्यावी, अशा सूचना याबैठकीमध्ये दिल्या. यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here