उद्या राजुरा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याचे अनावरण आणि खासदार प्रतिभा धानोरकरांच्या सत्काराचे आयोजन

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :  उद्या दिनांक १२ जून २०२४ रोज बुधवारला राजुरा तालुका काँग्रेसचे कार्यालय, गांधी भवन येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुर्नाकृती पुतळ्याचे अनावरण आणि चंद्रपूर- १३ लोकसभा मतदार संघाच्या नवनिर्वाचित खासदार श्रीमती प्रतिभा बाळूभाऊ धानोरकर यांचा जाहीर सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीमती धानोरकर यांच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोषात गौरव करण्याच्या हेतूने सायंकाळी ७ वाजता गांधी चौक, राजुरा येथे श्रीमती धानोरकर यांचा भव्य सत्कार आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहोळ्याचे आयोजन करण्यात आले असून यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या श्रीराम मंदिर राजुरा जवळील जनसंपर्क कार्यालया समोरून सायंकाळी ६ वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लोकप्रिय आमदार मा. आ. सुभाषभाऊ धोटे, सत्कारमूर्ती मा. खासदार श्रीमती प्रतिभा बाळूभाऊ धानोरकर, प्रमुख अतिथी मा. आ. श्री. सुधाकर अडबाले प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
यानिमित्ताने होणाऱ्या भव्य मिरवणूक आणि सत्कार सोहळ्याला काँग्रेस आणि इंडिया तथा महाविकास आघाडी च्या सर्व घटक पक्षातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुका काँग्रेस, शहर काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस आणि काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशन च्या वतीने करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here