उरण सामाजिक संस्थेने आदिवासी महिलेस मिळवून दिला न्याय ♦️आजोबांची हडप केलेली पाच एकर जमीन परत मिळणार ♦️कोंकण विभागीय आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर यांची विशेष मदत ♦️महसूल मंत्री आणि उप विभागीय अधिकारी यांचा अंतिम निर्णय ♦️उरण सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. राजेंद्र मढवी यांचे सर्व स्तरांवर कौतुक

 

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

 

उरण दि 22
मौजे दिघोडे तालुका उरण येथील सर्व्हे नंबर 94/8 व 100/1 ही जमीन मिळकत सन 1961 मध्ये कुळ कायद्या अन्वये गोपाळ लहाण्या कातकरी यांच्या नावे होती. सन 1980 मध्ये त्यांच्या मृत्यू नंतर त्यांचे तीन मुलगे पोशा, पांडुरंग, लक्ष्मण यांची नावे वारसा हक्काने लागणे गरजेचे होते. परंतु तत्कालीन तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांनी संगनमत करून गोपाळ लहाण्या कातकरी यांचे वारस म्हणून आगरी समाजाचे 1) तुळशीराम बाबू घरत, 2)लहू बाबू घरत, 3)अंकुश बाबू घरत, 4) भरत बाबू घरत यांची नावे अवैधरीत्या सात बारा सदरी दाखल केली. सन 1996 मध्ये ही जमीन मिळकत घरत कुटुंबीय यांनी नोंदणीकृत खरेदी खताने मुंबई स्थित उद्योजक कैलास सुर्वे यांना अंदाजे रुपये 5,20,000/- रुपयांना विकली. कैलास सुर्वे यांनी सन 1996 मध्ये सदरहू जागेवर व्यवसाय सुरू करून त्या जागेवरून कातकरी कुटुंबास हाकलून लावले.

 

सदर चुकीची नोंद रद्द करण्यासाठी उप विभागीय अधिकारी पनवेल यांच्या कोर्टात अपील दाखल करण्यात आले होते . गुणवत्ता पाहून चाळीस वर्षांचा विलंब माफ करण्यात आला. त्या विलंब माफीच्या निर्णयाला महसूल मंत्री न्यायालयात कैलास सुर्वे यांनी दाद मागितली. परंतु महसूल मंत्री यांनी देखील विलंब माफ केला आणि उप विभागीय अधिकारी राहुल मुंडके यांनी मुक्ता कातकरी हिच्या बाजूने निर्णय देवून जागा कातकरी कुटुंबाच्या कायदेशीर वारसांच्या नावे करण्यास सांगितले. त्यामुळे आदिवासी समाजातील हा एक ऐतिहासिक विजय ठरणार आहे. ही न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना त्या एक वर्षात कैलास सुर्वे आणि घरत कुटुंबीय ही जमीन मिळकत सोडायला तयार नसल्याने मुक्ता कातकरी हीने उरण पोलीस स्टेशन मध्ये ऍट्रॉसिटीची तक्रार दाखल केली असून त्या केस संदर्भात अटक पूर्व जामीन अर्जावर जिल्हा व सत्र न्यायालय पनवेल येथे सुनावणी सुरू आहे.

 

हा विषय पूर्णपणे उरण सामाजिक संस्थेच्या वतीने प्रा. राजेंद्र मढवी यांनी उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील आणि संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार यांच्या मार्गदर्शाखाली हाताळला असून मागील दोन वर्ष अनेक लोकांनीं सहकार्य केलेले आहे. त्यात विशेष म्हणजे कोंकण विभागीय आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांनी हे प्रकरण विशेष लक्ष देवून संबंधित अधिकारी यांना आवश्यक सूचना केल्या.आणि मुक्ता कातकरी हिला मार्गदर्शन देखील केले. माननीय जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांनी ह्या प्रकरणात विधान सभेचे अधिवेशन सुरू असताना माननीय महसूल मंत्री यांची भेट घेवून हे गंभीर प्रकरण समजावून सांगितले. माननीय निवासी उप जिल्हाधिकारी डॉ पद्मश्री बैनाडे, उप जिल्हाधिकारी अमोल यादव, उप जिल्हाधिकारी म्हस्के पाटील, तहसीलदार विशाल दौंडकर, नायब तहसीलदार गोतरणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून सर्व स्तरांवर मदत केली. हा न्याय मिळवून देण्यासाठी उप विभागीय पनवेल अधिकारी राहुल मुंडके आणि तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी जीवाचे रान केले. ह्या केस च्या प्रत्येक स्तरावर तसा प्रत्यक्ष त्यांच्या तालुक्यातील प्रश्न नसताना सुद्धा तहसीलदार पनवेल विजय तळेकर यांनी वेळोवेळी उप विभागीय अधिकारी यांचा समन्वयक म्हणून महत्वाची भूमिका बजावली. सर्व पत्रकार बंधू यांनी सर्व स्तरांवर बातम्या देवून सदर प्रकरणास प्रसिद्धी दिली.जेष्ठ पत्रकार पत्रकार उमेश परिदा,जेष्ठ पत्रकार जगदीश तांडेल,पत्रकार विठ्ठल ममताबादे यांचेही सुरवातीपासून ते शेवटपर्यंत मोलाचे सहकार्य लाभले.सदर या यशात खरं म्हणजे सामाजिक कार्यकर्ते प्रा. राजेंद्र मढवी आणि दत्ता गोंधळी, नामदेव ठाकूर, मनीष कातकरी, रत्नाकर घरत यांचा सिंहाचा वाटा आहे.अध्यक्ष सुधाकर पाटील यांचे उत्कृष्ठ पद्धतीच्या पत्र व्यवहारच या यशाचे गमक असून आवश्यक त्या ठिकाणी संतोष पवार यांनी महसूल विभागातील कार्यालयांत जावून ही केस समजावून सांगितल्या मुळे आणि संस्थेच्या सर्व सदस्यांच्या सहकार्यामुळेच हे प्रकरण लवकर सुटले आहे. न्यायालयीन पातळीवर सर्व वकीलांनी महत्वाचा रोल बजावला त्यात ॲड सुरेश ठाकूर, ॲड प्रियांका ठाकूर, ॲड सिद्धार्थ इंगळे, ॲड दत्ता नवाले, ॲड दिपाली गुरव, ॲड राहुल मोरे, ॲड अक्षय गवळी यांनी मुक्ताची बाजू ठाम पणे मांडली. प्रा राजेंद्र मढवी यांनी सहकार्य करणाऱ्या ईतर अधिकारी समाजातील इतर अनेक घटकांचे कळत नकळत राहिलेल्या सर्वांचे आभार मानले.मुक्ता कातकरी हिच्या बाजूने निकाल लागल्याने मुक्ता कातकरी हिने न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्वांचे आभार मानले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *