एमएचटी सीईटी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी रमाकांत ठाकरे चे रामनगर वासियानी केले कौतुक:-

 

लोकदर्शन 👉 प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपना येथिल रामनगर निवासी संजय ठाकरे यांचे चिरंजीव रमाकांत ठाकरे याने एम एच टी सी ई टी परीक्षेत ९८.९४ परसेंटाइल प्राप्त केले आहेत, तर फिजीक्स मध्ये ९९.२७ टक्के प्राप्त केले, बारावी बोर्ड परिक्षेत सुद्धा प्रावीण्य प्राप्त केले. वार्डातिल नागरिकाना अभिमानास्पद असे यश संपादन केल्याने माजी प्राचार्य संजय ठावरी यानी आपल्या सहकार्याना निमंत्रित करुण आई वडिल, भाऊ समवेत रमाकांत चे अभिनन्दन केले तर, माजी नगरसेवक सुभाषभाऊ तुरानकर यांनी पालकांचे शाल श्रीफल पुष्प भेट देऊन अभिनंदन केले तर आई सौ. पुष्पा हिचे शाल श्रीफल पुष्प भेट देऊन वैशालीताई कवरासे यांनि कौतुक केले.या प्रसंगि दादाजी पाटिल तुरानकर, अनिलभाऊ कवरासे, उदे सर, कोड़ापे सर,विनोद मालेकर, ऋषि जोगी, गणेश तुरानकर, अभिजीत ठावरी, आकाश तुरानकर, सौ. शोभाताई तुरानकर, संगीताताई मालेकर, माधुरी ठावरी, व महीला बालक उपस्थित होते. प्राचार्य ठावरी यांनि रमाकांत हा शांत, संयमी, आदरार्थी, व गुणवंत असुन त्याने या यशातुन सिद्ध केले असुन तो वार्डात कौतुकास पात्र आहे त्यास पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर रमाकांत ने यशाचे श्रेय आई बाबा, आई एस एम एकेडमी चे प्राध्यापक, व सर्व मार्गदर्शक याना दिले. आभार संजय ठाकरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here