कोरपना तालुक्यात वादळी पाऊस : झाड कोसळून महिलेचा मृत्यू

by : Shankar Tadas
कोरपना : तालुक्याला आज दुपारी प्रचंड वादळी पावसाचा तडाखा बसला. दरम्यान वडगाव येथे झाड कोसळून महिलेचा मृत्यू झाला.
वडगाव येथील शेतात कामाला गेलेल्या वर्षा अशोक उरकुडे (वय 35) या महिलेवर झाड कोसळून जागीच मृत्यू झाला. गुलाव जिवतोडे यांच्या शेतात सरकी टिबायला सदर महिला गेली होती. आज 10 जून रोजी दुपारी झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे ती झाडाखाली थांबली. तेव्हा झाड कोसळून तिचा मृत्यू झाला. तालुक्यात विविध ठिकाणी घरांची पडझड झाली, पत्रे उडाले. बोरी नवेगाव, आसन कढोली परिसरात या वादळाने अधिक नुकसान झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here