सलग पाचव्या दिवशीही राजुरा महिला काँग्रेसच्या वतीने गरजूंना अन्नदान.

By : Mohan Bharti

राजुरा  :– उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथील कोवीड सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना आमदार सुभाष धोटे यांचे नेतृत्व आणि मार्गदर्नाखाली राजुरा महिला काँग्रेसच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व म्हणून एक घास मदतीचा या उपक्रमांतर्गत मोफत अन्नदान वितरित करण्यात आले. महिला काँग्रेसच्या वतीने गरजूंना मोफत अन्नदान वितरित करण्याचा आज पाचवा दिवस आहे.
या प्रसंगी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, सभापती मुमताज जावेद अब्दुल, देवाडाचे उपसरपंच जावेद मजिद अब्दुल, नगरसेवक गजानन भटारकर, नगरसेविका तथा महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष संध्या चांदेकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. लहू कुलमेथे, डॉ. आरके मॅडम, डॉ. गायकवाड, डॉ. यादव, डॉ. चिदमवार, रामनगर काँग्रेस अध्यक्ष पुनम गिरसाळवे, महिला कार्याध्यक्ष शुभांगी खामनकर, जवाहर नगर काँग्रेस उपाध्यक्ष योगिता मटाले, राजकुमार ठाकूर, हेमंत झाडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *