लोकदर्शन 👉मोहन भारती
गडचांदूर : दिनांक २३/०५/२०२६ रोजी महात्मा गांधी विद्यालय येथे आयोजित बाल संस्कार शिबिरामध्ये श्री प्रमोद मोहुरले, गडचांदूर यांनी “व्यसनमुक्ती” या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध व्यसनांचे दुष्परिणाम समजावून सांगत चांगले संस्कार, शिस्तबद्ध जीवन आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी श्री कनके महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच विद्यालयातील गुरुजन व शिबिरामध्ये सहभागी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत व्यसनमुक्त समाज निर्माण करण्याचा संकल्प व्यक्त केला.
या मार्गदर्शन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचारांची प्रेरणा निर्माण झाली असून, सामाजिक जाणीव जागृत करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.





