Home
Home गडचांदूर / कोरपणा दिव्यांगांच्या ५% निधीचे तात्काळ वाटप करा; अन्यथा नगर परिषदेत मुक्काम मोर्चा —...

दिव्यांगांच्या ५% निधीचे तात्काळ वाटप करा; अन्यथा नगर परिषदेत मुक्काम मोर्चा — बिडकर यांचा इशारा

लोकदर्शन 👉मोहन भारती

नगर परिषदेकडून दिव्यांग बांधवांना शासन निर्णयानुसार वार्षिक उत्पन्नातून राखीव ५% निधी देण्यात येतो. मात्र मार्च महिना संपून मे महिना सुरू झाला तरीही अद्याप निधीचे वाटप करण्यात आले नसल्याची तक्रार दिव्यांग बांधवांनी प्रहार संघटनेचे बिडकर यांच्याकडे केली.

यानंतर बिडकर यांनी दिव्यांग बांधवांसह नगर परिषद गाठली. मात्र मुख्याधिकारी रजेवर असल्याने निधी वाटपाबाबत ठोस माहिती मिळू शकली नाही. यावेळी प्रशासकीय अधिकारी आदित्य खापणे यांना निवेदन देत आठ दिवसांच्या आत दिव्यांग बांधवांचा ५% निधी तात्काळ वितरित करावा, अशी मागणी करण्यात आली.

तसेच दिव्यांग बांधवांचे सर्व अर्ज नियमानुसार छाननी करून पात्र लाभार्थ्यांना लाभ द्यावा, तसेच मागील वर्षीचा उर्वरित निधीही यामध्ये समाविष्ट करून संपूर्ण निधी वाटप करावा, अशी मागणी करण्यात आली.

अन्यथा आठ दिवसांनंतर सर्व दिव्यांग बांधवांसह नगर परिषदेत मुक्काम मोर्चा काढण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही बिडकर यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here