लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर, दि. ०२ एप्रिल २०२६ (गुरुवार) — श्री हनुमान जयंतीनिमित्त जयहिंद कॉटन मिल, कवठाळा येथील संचालक श्री हंसराजजी चौधरी यांनी आमदार देवरावजी भोंगळे यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच विविध विषयांवर परस्पर संवाद साधण्यात आला. या प्रसंगी भाजपा व्यापारी संयोजक गडचांदूर मंडळाचे विश्वंभर झाम उपस्थित होते.
जयहिंद कॉटन मिल परिसरात मिलतर्फे श्री हनुमान मंदिराची स्थापना करण्यात आली असून दरवर्षी येथे हनुमान जयंती उत्साहात साजरी केली जाते. यावेळी भोजनदानाचाही कार्यक्रम आयोजित केला जातो.
सदर कॉटन मिलमुळे परिसरातील शेतकऱ्यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध झाली असून त्यांच्या कापसाला योग्य दर मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे ही मिल अल्पावधीतच परिसरात परिचित व नामांकित होत असल्याचे दिसून येत आहे.





