आदिवासी बांधवांसोबत आमदार देवराव भोंगळे यांनी साजरी केली दिवाळी

By : Shankar Tadas
कोरपना : दिवाळी हा वर्षभरातील सर्वात मोठा प्रकाशाचा, आणि आनंदाचा सण आहे. यंदा आदिवासी बांधवांच्या दिवाळीच्या उत्सवात भर घालत कोरपना तालुक्यातील निजामगोंदी येथे आमदार देवराव भोंगळे यांनी आदिवासी बांधवांसोबत सामाजिक बांधिलकी जोपासत दिवाळीचा अनोखा उत्सव साजरा केला.

आदिवासी बांधवांसोबत दिवाळीच्या उत्साहात आमदार देवराव भोंगळे सहभागी झाल्याने निजामगोंदी गावामध्ये दिवाळीचा उत्साह ओसंडून वाहत होता. आदिवासी बांधवांच्या घरी रांगोळ्यांनी सजलेले अंगण दिवाळीचा उत्साह अधिकच वाढवीत होते.
यावेळी आमदार देवराव भोंगळे यांनी गावात येताच त्यांचे आदिवासी बांधवांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी पारंपारिक वाद्यांच्या गजरात पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करण्यात आले.या आदिवासी नृत्याने आमदार भोंगळे भारावून गेले.

यावेळी बोलताना आमदार भोंगळे म्हणाले, दिवाळी हा वर्षभरातील सर्वात मोठा सण आहे. या आनंदाच्या उत्साहात सर्वांनी सहभागी होऊन एकमेकांशी प्रेम,आपुलकी, वृद्धिंगत करावी. यंदा आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करताना मनाला आत्मिक समाधान मिळाले हा माझ्यासाठी खुप मोठा आनंदाचा क्षण असल्याचे मत आमदार भोंगळे यांनी व्यक्त केले.

या उपक्रमामुळे यंदा आमदार देवराव भोंगळे यांनी आदिवासी बांधवांसोबत अनोखी दिवाळी साजरी करीत समाजात सामाजिक सलोखा आणि एकात्मतेचा संदेश दिला. यावेळी गावात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पारंपारिक आदिवासी नृत्याचे आमदार देवराव भोंगळे यांनी कौतुक केले.

यावेळी कार्यक्रमाला भाजपा कोरपना तालुकाध्यक्ष संजय मुसळे, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुण मडावी, तालुका महामंत्री पुरुषोत्तम भोंगळे, महामंत्री अरुण रागीट, तालुका उपाध्यक्ष जगदीश पिंपळकर, प्रमोद पायघन, भाजयुमोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा धानोलीचे उपसरपंच ओम पवार, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने, भाजयुमोचे कोरपना तालुकाध्यक्ष दिनेश खडसे,भाजयुमोचे तालुका महामंत्री विशाल अहिरकर, अनुसूचित जाती आघाडीचे तालुकाध्यक्ष धम्मकिर्ती कापसे, सतीश जमदाडे, सचिन आस्वले, सुभाष ठाकरे, गिरिधर चरडुके, देवराव परचाके,राहुल हिंगाणे,नरेश मानपल्लिवार, पोलीस पाटील श्रीहरी कुबडे,दीपक वाडघुरे, रुपेश भोयर, रवी बंडिवार, प्रकाश चौधरी, चिंनु येडमे, श्यामसुंदर पेंदोर, श्यामराव कुमरे,लिंगु चायकाटे, महादू चायकाटे, मारोती कोवे, पत्रू मडावी, बंडू तोडासे, गंगाराम चायकाटे, जंगा चायकाटे, विकास चायकाटे यांचेसह आदिवासी बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here