बिबी ग्रामपंचायतीचा उपक्रम : वंचित लाभार्थ्यांसाठी संवादातून न्यायाची वाट

लोकदर्शन👉:मोहन भारती

जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथे ग्रामपंचायतीतर्फे “निराधार व घरकुल लाभार्थी संवाद कार्यक्रम” आयोजित करण्यात आला. या उपक्रमात शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांपासून वंचित राहिलेल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

कार्यक्रमात ग्रामपंचायतीचे उपसरपंच आशिष देरकर यांनी सांगितले की, “पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या योजना पारदर्शकतेने मिळाल्या पाहिजेत. संवादातून समस्यांचे निराकरण शक्य होते.” ग्रामपंचायतीच्या नोंदीनुसार ७९ लाभार्थी अजूनही आर्थिक अनुदानापासून वंचित आहेत. त्यांच्या प्रकरणांची संपूर्ण माहिती संबंधित विभागाकडे पाठवून त्वरित तोडगा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात सरपंच माधुरी टेकाम आणि ग्रामपंचायत अधिकारी धनराज डुकरे यांनी घरकुल योजनेतील अर्ज प्रक्रिया, निधी वाटपाची पद्धत व अडचणींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सर्व लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे वेळेवर सादर करण्याचे आवाहनही केले.

ग्रामविकास समिती सदस्य, महिला बचतगट प्रतिनिधी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संवाद उपक्रमातून ग्रामपंचायतीने प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद बळकट करत वंचित लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचा ठोस प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here