✨ बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा “नवदुर्गा सन्मानपत्र” देऊन गौरव ✨

लोकदर्शन बदलापूर (प्रतिनिधी 👉 गुरुनाथ तिरपणकर)

ॐ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते ॥

नारी हीच शक्ती, संस्कार आणि श्रद्धेचं प्रतीक आहे. घर-संसार, मुलांचे संगोपन, शैक्षणिक उन्नती यांसोबतच पोलिस खात्यात कर्तव्यनिष्ठेने सेवा बजावणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यासाठी जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर “नवदुर्गा सन्मानपत्र” प्रदान करण्यात आले.

बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन येथे झालेल्या या सोहळ्यात महिला पोलीस कर्मचाऱ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भेटवस्तू व “नवदुर्गा सन्मानपत्र” देऊन सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांना “समाजरत्न पुरस्कार” देऊन गौरवण्यात आले. पोलीस निरीक्षक गज्जल यांनी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक करत महिला पोलिसांना सन्मानित करण्याच्या या उपक्रमाला अभिवादन केले.

प्रमुख पाहुणे म्हणून सुवर्णा इसवलकर (अखिल भारतीय हिंदू महासभा संघटक), ममता मसुरकर (प्रिन्सिपल, रायझिंग स्टार नर्सरी प्रायमरी स्कूल व समाजसेविका), दिलीप शिरसाट (सेवानिवृत्त पोलिस अधिकारी), सुहास सावंत (अध्यक्ष, उमेद बहुउद्देशीय सामाजिक संस्था), राजेंद्र नरसाळे (सचिव, सिटीझन वेल्फेअर असोसिएशन), रामजित (जीतू) गुप्ता (मुख्य तपासी अधिकारी, ॲन्टीपायरसी सेल मुंबई व संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार), तसेच कर्तृत्वदक्ष रायटर विष्णू मिरकले सर उपस्थित होते.

सर्व मान्यवर पाहुण्यांचा शाल व उत्कृष्ट वाचनिय पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभारप्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विष्णू मिरकले, दत्ता कडुलकर व गंधाली तिरपणकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनच्या कार्यालयात पार पडलेला हा “नवदुर्गा सन्मानपत्र सोहळा” मोठ्या उत्साहात आणि गौरवपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here