लोकदर्शन 👉रघुनाथ ढोक
पुणे : समाजपरिवर्तन, शेतकरी चळवळ आणि प्रगतिशील विचारांचा प्रचार यासाठी आयुष्य समर्पित केलेले ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांना यंदाचा ‘सत्यशोधक शिक्षक पुरस्कार’ जाहीर झाला आहे. हा सन्मान रविवार, दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी पुण्यातील श्री.शिवाजी मराठा सोसायटीच्या श्रीमंत खासेसाहेब पवार सभागृहात प्रदान करण्यात येणार आहे.
या सोहळ्यात ज्येष्ठ सत्यशोधक उत्तमराव (नाना) पाटील, तरवडी यांच्या शुभहस्ते डॉ. आढाव यांना गौरविण्यात येणार असून, कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आयएएस अधिकारी महेश झगडे करतील. अध्यक्षस्थानी शेतकरी उद्योजक राजकुमार धुरगुडे असतील, तर स्वागताध्यक्ष म्हणून सोसायटीचे सचिव अण्णासाहेब थोरात काम पाहतील.
प्रमुख पाहुण्यांमध्ये सामाजिक कार्यकर्त्या अबेदा इनामदार, माजी महापौर वैशाली बनकर, कमल व्यवहारे यांचा समावेश आहे. विशेष अतिथी म्हणून कुलपती शिवाजीराव कदम, पुणे जिल्हा मंडळ सचिव संदीप कदम, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सचिव सौ. प्रमिलाताई गायकवाड, अभिनव शिक्षण संस्थेचे राजीव जगताप, मराठवाडा मित्र मंडळ शिक्षण संस्थेचे डॉ. भाऊसाहेब जाधव, तसेच प्रा. शरदचंद्र काकडे, विलास साठे, उद्योजक किरण इंगोले आणि आर्किटेक्ट मारुतीराव जाधव उपस्थित राहणार आहेत.
📖 वैचारिक संवाद व विशेष सत्रे
कार्यक्रमात “शाक्त शिवराज्याभिषेकाची प्रेरणा” आणि महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीची आजच्या काळातील गरज या विषयांवर वैचारिक सत्रे होणार आहेत.
उद्घाटक : बुवासाहेब हुंबरे (बारामती प्रणाली शिक्षण संस्था)
अध्यक्ष : अरविंद खैरनार (सत्यशोधक समाज संघ)
वक्ते : शिवचरित्र अभ्यासक गंगाधर बनबरे, सत्यशोधक विचारवंत कॉ. किशोर ढमाले
विशेष सत्रात “संविधान संस्कृती व बहुजन क्रांती” या विषयावर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड संवाद साधणार असून, अध्यक्षस्थानी अभिनेते व विचारवंत किरण माने असतील.
🎶 सांस्कृतिक सादरीकरण व साहित्यिक सहभाग
स्वागतगीत : राखी रासकर
कविगायन : बाबासाहेब जाधव व टीम
प्रास्ताविक : प्रा. प्रतिमा परदेशी, अप्पासाहेब गायकवाड, प्रा. उद्धव कोळपे, प्रा. अमृतराव काळोखे
सूत्रसंचालन : पत्रकार मुकुंद काकडे, अॅड. नीरज धुमाळ, मोहिनी कारंडे, प्रा. संजयकुमार कांबळे
आभार : डॉ. प्रा. दत्ताजीराव जाधव, अंजुम इनामदार, शिवाजी लोखंडे, रघुनाथ ढोक
सत्यशोधक कार्यकर्त्यांना आवाहन
या कार्यक्रमात विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून, महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षाच्या पार्श्वभूमीवर सत्यशोधक कार्याचा नवा कृतीआराखडा तयार करण्याबाबत चर्चा होणार आहे.
शाक्त शिवराज्याभिषेक, सत्यशोधक समाज स्थापना दिन व संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष सोहळा समिती, पुणे यांच्या वतीने समाजातील सर्व सत्यशोधक व शिव–फुले–शाहू–आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.