लालगुडाजवळ कारचा भीषण अपघात : तरुणी ठार, दोघे गंभीर

By : Shankar Tadas
गडचांदूर :

राजुरा- गोविंदपुर आदिलाबाद महामार्गावर कोरपण्यावरून गडचांदूरच्या दिशेने येणारी स्विफ्ट डिझायर क्रमांक एम एच 40 बीजे 73 39 ला झालेल्या भीषण अपघातात एक तरुणी जागीच ठार झाली, तर दोघे तरुण गंभीर जखमी झाले. सायंकाळी साडेपाच वाजता ही घटना घडली. लालगुडा फाट्यावर असलेल्या हनुमान मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेल्या भक्तांच्या उभ्या स्कॉर्पिओ गाडीवर अचानकपणे सदर वाहन धडकले. यातच चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी झाल्यामुळे गाडीमध्ये बसलेली वैशाली कोचाडे 25 राजुरा ही जागीच मृत्युमुखी पावली. यात गंभीर जखमी झालेले करण पंधरे 17 रा. शिवनी चंद्रपूर, प्रेम कोवे 22 यांना गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र परिस्थिती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आले. पुढील तपास गडचांदूरचे ठाणेदार शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here