लोकदर्शन 👉 मोहन भारती
कोरपना :दिनांक 23सप्टेंबर
“स्मार्ट ग्राम” म्हणून नावारूपास आलेल्या बिबी ग्रामपंचायतीचे उपसरपंच आशिष देरकर यांनी जलजीवन मिशनमधील ढिसाळ व फसव्या कारभाराविरोधात ग्रामस्थांच्या उपस्थितीत तीव्र रोष व्यक्त करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, जलजीवन मिशनअंतर्गत झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे गावातील काँक्रिट रस्ते उद्ध्वस्त झाले, भूमिगत ड्रेनेज व्यवस्था खिळखिळी झाली, त्यामुळे वृद्ध, महिला व बालकांना प्रवास करणे कठीण झाले आहे. कंत्राटदारांनी अर्धवट कामे सोडून पलायन केल्याने ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच, ऑक्टोबर 2024 पासून केंद्र सरकारकडून राज्याला निधी मिळालाच नाही, अशी बाबही अधोरेखित करण्यात आली. परिणामी अनेक कंत्राटदारांची देणी थकली असून, गावोगावी अपूर्ण व रखडलेली कामे ग्रामपंचायतींच्या माथी मारली जात आहेत, असा आरोप निवेदनात करण्यात आला.
ग्रामपंचायतीच्या ठाम मागण्या :
केंद्र सरकारने राज्याला थकीत निधी तात्काळ द्यावा
फोडलेले रस्ते व उद्ध्वस्त ड्रेनेजची दुरुस्ती तातडीने करावी
जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या अपूर्ण योजना त्वरित पूर्ण कराव्यात
या योजनेमुळे झालेल्या हानीची थेट जबाबदारी केंद्र सरकारने स्वीकारावी
सोमवारी उपसरपंच आशिष देरकर यांनी कोरपना तहसीलदार पल्लवी आखरे यांच्यामार्फत हे