गडचांदूरच्या ऐतिहासिक भूमीवर समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबीर भव्य यशस्वी – डॉ. आनंद तेलतुंबडे यांचे मार्गदर्शन ठरले प्रेरणादायी

गडचांदूरच्या ऐतिहासिक भूमीवर समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबीर भव्य यशस्वी – डॉ. आनंद तेलतुंबडे यांचे मार्गदर्शन ठरले प्रेरणादायी

लोकदर्शन गडचांदूर 👉 – अशोक कुमार भगत):

ऐतिहासिक बुद्धभूमी गडचांदूर येथे नुकतेच संपन्न झालेले समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबीर भव्य आणि यशस्वी ठरले. या शिबिरात विशेष मार्गदर्शक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातजावई, प्रख्यात विचारवंत व प्राध्यापक डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी उपस्थित राहून दलाच्या कार्याची, इतिहासाची आणि आजच्या परिस्थितीत त्याच्या आवश्यकतेची सखोल मांडणी केली. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी शिबिराला विशेष महत्त्व लाभले.

या शिबिरात एकूण ३५ नवीन सैनिकांनी प्रशिक्षण पूर्ण केले, तर जुन्या सैनिकांचीही लक्षणीय उपस्थिती होती. उद्घाटन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आयु. किशोर तेलतुंबडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी आयु. बादल चांदेकर (उपाध्यक्ष, संरक्षण विभाग, कोरपना) होते.

विशेष अतिथी आणि प्रशिक्षक :
प्रा. आयु. आनंद तेलतुंबडे, प्राचार्य डॉ. सोमाजी गोंडाणे विशेष अतिथी होते. प्रशिक्षणाची जबाबदारी लेफ्टनंट कर्नल आयु. प्रफुल भगत आणि लेफ्टनंट कर्नल आयु. गुरूबालक मेश्राम यांनी पार पाडली. डिव्हिजन ऑफिसर आयु. साक्षीताई नळे यांनी सहाय्यक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली.

शिबिरात भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष आयु. श्रावण जिवणे (कोरपना), आयु. दीपक साबणे (जिवती), सरचिटणीस आयु. गिरीष पाझारे, कोषाध्यक्ष आयु. उत्तम पारेकर, गडचांदूर शहर अध्यक्ष आयु. पद्माकर खैरे आणि सामाजिक कार्यकर्ते आयु. मधुकर चुनारकर यांची विशेष उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे संचालन आयु. राहुल निरंजने यांनी केले. प्रास्ताविक आयु. गिरीष पाझारे यांनी सादर केले तर आभार प्रदर्शन आयु. पद्माकर खैरे यांनी केले.

धम्ममित्र आयु. अमित थोरात व राठोड सर यांच्या मित्रमंडळींनी दानपारमितेचे पालन करत मसालाभात आणि जिलेबीचे वाटप केले. या सामाजिक बांधिलकीने शिबिर अधिक अर्थपूर्ण ठरले.

या शिबिराने समता सैनिक दलाच्या विचारधारेस नवचैतन्य दिले असून, समता–बंधुता आणि सामाजिक न्यायासाठी नवी प्रेरणा निर्माण झाली आहे. गडचांदूरच्या सामाजिक व सांस्कृतिक इतिहासात या शिबिराची नोंद एक महत्त्वाचा टप्पा म्हणून केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here