लोकदर्शन.👉मोहन भारती
मुंबई : महाराष्ट्रात प्रशासन सुलभ आणि जनतेच्या सोयीसाठी राज्यात २० नवे जिल्हे आणि ८१ तालुके निर्माण करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
नव्या जिल्ह्यांची निर्मिती झाल्यास प्रशासन अधिक परिणामकारक पद्धतीने राबवता येईल आणि नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ सहज मिळेल, असे ते म्हणाले. महसूल विभागाने याबाबत अभ्यास सुरू केला असून लवकरच शासन पातळीवर अंतिम निर्णय होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
राज्यातील वाढती लोकसंख्या, विस्तीर्ण भूभाग आणि प्रशासनिक कामकाजाचा वाढता ताण यामुळे जिल्हे व तालुके विभागण्याची गरज निर्माण झाली आहे. या प्रस्तावामुळे ग्रामीण भागातील विकासकामांना वेग मिळणार असून, स्थानिकांना तातडीने शासकीय सेवा उपलब्ध होतील, असा विश्वास महसूल मंत्र्यांनी व्यक्त केला.