लोकदर्शन /गडचंदूर :👉मोहन भारती
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित आणि इन्फंट जीजस सोसायटी संचालित गडचंदूर (खिर्डी) येथील कृषी महाविद्यालयात नवप्रवेशीत विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा उत्साहात पार पडला.
या प्रसंगी वक्त्यांनी कृषी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, शाश्वत शेती पद्धती आणि संशोधनाचा लाभ घेऊन कृषी क्षेत्रात नवे पर्व घडविण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व अतिथी
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक व माजी आमदार सुभाष धोटे होते. प्रमुख अतिथी म्हणून तुकाराम पवार, प्राचार्य अनिल चिताडे, विठ्ठलराव थिपे, सुभाष गोरे, नोगराज मंगरूळकर, पंकज पवार यांची उपस्थिती होती.
मान्यवर व उपस्थिती
संस्थेचे अध्यक्ष अभिजीत धोटे, दत्ता जाधव, श्रीजा मॅडम, विकास बोरकुटे यांच्यासह प्राध्यापकवर्ग, पालकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.