लोकदर्शन चंद्रपूर👉 डॉ. नंदकिशोर मैंदळकर
चंद्रपूर – लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या पार्श्वभूमीवर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक समरसता गतिविधी व चिल्ड्रन अकॅडमी स्कूल, पठाणपुरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त सुनंदा पान्हेरकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
स्पर्धेत प्रथम क्रमांक दिनेश गिरी (चिमूर), द्वितीय ज्योती कोरडे (राजुरा), तृतीय सोनिया प्रसाद (बल्लारपूर) यांना तर प्रोत्साहनपर क्रमांक रूपाली काळे (चंद्रपूर) यांना देण्यात आला. विजेत्यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशांत हजबंन होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा संघचालक तुषारजी देवपुजारी, समरसता गतिविधीचे संयोजक डॉ. नंदकिशोर मैंदळकर, मोहन जीवतोडे, वसंत भलमे, श्रीराम पानेरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
तुषारजी देवपुजारी यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत उपस्थितांना प्रेरणा दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नंदकिशोर मैंदळकर यांनी केले, संचालन ओजस्विनी बोरीकर यांनी तर आभार प्रदर्शन दीक्षा कुंमरे यांनी केले.
या कार्यक्रमातून सामाजिक समरसतेचा संदेश देत, अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन करण्यात आले.