आदिवासी कोलाम बांधवांची आर्थिक फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा : माजी आमदार संजय धोटे

By : Shankar Tadas
गडचांदूर : आदिवासी समुदायातील कोलाम बांधवांच्या नावे ग्रामीण बँक गडचांदुर येथुन परस्पर कर्ज उचलुन कोलाम समाज बांधवांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आल्याचे धक्कादायक प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. जिवती तालुक्यातील मरकागोंदी,चिखली,निजामगोंदी,मारोतीगुडा,धनकदेवी येथील गरीब आदिवासी बांधवांनी माजी आमदार संजयभाऊ धोटे यांच्याकडे आर्थिक पिळवणुकीची आपबिती सांगितली.
माजी आमदार संजयभाऊ धोटे यांनी याबाबत पोलिस निरीक्षक गडचांदुर यांच्याकडे लेखी तक्रार नोंदवुन जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून आरोपीना कठोर शिक्षा व्हावी यासाठी निवेदन देण्यात आले.
सन २०२२ मध्ये जिवती तालुक्यातील शेतमजूर असलेल्या कोलाम बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ तुम्हाला द्यायचा आहे असे सांगून विनायक राठोड रा.सारंगापुर ता.जिवती व त्यांचे सहकारी तसेच तत्कालीन बैंक मैनेजर हजारे यांच्या सहकार्याने ५० पेक्षा अधिक कोलाम बांधवांच्या नावे प्रत्येकी १ लक्ष ५० हजार रुपयांची बनावट ७/१२ दाखवुन लोन उचलले आणि आदिवासींना फक्त ५ ते १० हजार रुपये देऊन त्यांची फसवणूक केली. ८ दिवसांपुर्वी ग्रामीण बैंक गडचांदुर यांनी कर्ज वसुलीसाठी नोटीस दिल्याने हा गैरप्रकार समोर आला. यात फसवणूक झाल्याचे समजताच संबंधित बांधवांनी माजी आमदार संजयभाऊ धोटे यांना ही बाब अवगत करून दिली.त्यांनी लगेच पोलिस स्टेशन कोरपणा व पोलिस स्टेशन गडचांदुर गाठुन पोलिसांत फसवणूकिची तक्रार दाखल केली.
विनायक राठोड व त्याच्या सहकाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी राज्याचे गृहमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आल्याचे संजय धोटे यांनी सांगितले.
यावेळी संजयभाऊ धोटे यांच्या समवेत युवा उद्योजक निलेश ताजणे,भाजपा ज्येष्ठ नेते संदिप शेरकी,ज्येष्ठ नेते शिवाजीराव शेलोकर,पत्रकार अनिल कौरासे,कुणाल पारखी,सुयोग कोंगरे,अजिम बेग,शुभम थिपे यांच्या सह मौजा सारंगापुर, मरकागोंदी,धनकदेवी,मारोतीगुडा,निजामगोंदी, चिखली येथील असंख्य पिडीत महिला व पुरुष उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here