तळागाळातील नागरिकांशी नाळ जोडलेल व्यक्तिमत्व म्हणजे सुधीरभाऊ : सतीश उपलेंचवार

By : Shankar Tadas

* आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त
नांदा फाटा येथील रक्तदान शिबिरात ५३ रक्तदात्यांचे रक्तदान

नांदा फाटा :

समाजाच काही देणं लागत या उदात्त हेतूने समाजकारणासोबत राजकारण करून आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर राबवून लाखो नागरिकांचा शस्त्रक्रिया मदत करून शहरा पासून गावखेड्यातील नागरिकांशी माजी मंत्री, आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी नाळ जोडली असल्याचे प्रतिपादन संघटन महामंत्री सतीश उपलेंचवार यांनी केले. ते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी तालुका अध्यक्ष संजय मुसळे, भाजपा उपाध्यक् पुरुषोत्तम भोंगळे, संजय चौधरी, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश खडसे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष ओम पवार, गुरूदेव प्रचारक बापूजी पिंपळकर, तालुका महामंत्री प्रमोद कोडापे,नांदा शहर अध्यक्ष संजय नित, बाखर्डीचे सरपंच अरुण रागीट, जगदीश पिंपळकर, महिला मोर्चा अध्यक्ष नम्रता डुकरे उपस्थित होते.

माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवसाचे औचित्य साधत भारतीय जनता पार्टी शाखा नांदा यांचा वतीने रक्तदान शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सुधीरभाऊ कार्यकर्ता जोपासणारा नेता असून रात्र दिवस मेहनत करून आपल्या क्षेत्राचा समस्या निवारण करीत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात अनेक मोठी कामे खेचून आणत त्यांनी विकास केला असल्याने लोक त्यांना विकास पुरुष म्हणून संबोधतात असे मत तालुका अध्यक्ष संजय मुसळे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख अतिथी संघटन महामंत्री सतीश उपलेंचवार, भाजपा तालुका अध्यक्ष, संजय मुसळे, भाजपा उपाध्यक्ष, पुरुषोत्तम भोंगळे, संजय चौधरी, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश खडसे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष ओम पवार, गुरूदेव प्रचारक बापूजी पिंपळकर, तालुका महामंत्री प्रमोद कोडापे, गडचांदूर शहर अध्यक्ष अरविंद डोहे,नांदा शहर अध्यक्ष संजय नित बाखर्डीचे सरपंच अरुण रागीट, विशाल अहिरकर, प्रमोद पायघन, जगदीश पिंपळकर, महिला मोर्चा जिल्ह्याचे महामंत्री विजया लक्ष्मी डोहे, महिला मोर्चा अध्यक्ष नम्रता डुकरे आदी उपस्थित होते.

रक्तदान शिबिरात नांदा, नांदा फाटा परिसरातील ५३ युवकांनी रक्तदान करून तसेच नांदा ते नांदा फाटा रस्त्यावर ५० वृक्षलागवट करून सुधीर मुनगंटीवार यांना शुभेच्छा दिल्या. तसेच नागपूर येथील जिवनज्योती या ब्लड बँकेनी विशेष सहकार्य केले.

यावेळी कार्यक्रमाचे संचालन सतीश जमदाडे यांनी केले, आभार संजय नित यांनी मानले. कार्यक्रमाचा यशस्वितेकरिता भारतीय जनता पार्टी शाखा नांदा पुरुष, महिला, युवा मोर्चाचा पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here