लोकदर्शन मुंबई 👉 मोहन भारती
मुंबई :30जुलै 2025
भाजपचे ज्येष्ठ नेते, तळागाळातील प्रश्नांवर बारकाईने लक्ष केंद्रित करणारे, आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अभ्यासू शैलीचे प्रतीक असलेले मा. आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी खास शुभेच्छा संदेश दिला.
या शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणाले की, “सुधीरभाऊ हे केवळ एक राजकारणी व्यक्तिमत्त्व नाहीत, तर सामाजिक प्रश्नांची गहिराईने जाण असलेले, अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व आहेत. त्यांचे विचार आणि कृती नेहमीच समाजाच्या शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी केंद्रित असतात.”
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुधीरभाऊंच्या कार्याचा उहापोह करताना त्यांच्या दीर्घ राजकीय वाटचालीतील ठळक टप्प्यांचाही उल्लेख केला. त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं की, “सुधीरभाऊंच्या रूपात एक अलौकिक, संयमी आणि संवेदनशील नेतृत्व आपल्या समाजाला लाभलं आहे. त्यांच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळते.”
शेवटी, “सुधीरभाऊ जनसेवेसाठी सदैव तत्पर राहोत, आणि त्यांच्या कार्याने महाराष्ट्र अधिक समृद्ध व सक्षम होवो,” अशा शुभेच्छा मुख्यमंत्री महोदयांनी व्यक्त केल्या.
🖋️ बातमीसाठी श्रेय – लोकदर्शन सकारात्मक लोकजागर
(समाजहितासाठी सचोटीची बातमीदारी)