🌀 विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा – नागरिकांनी घ्यावी काळजी
लोकदर्शनमुंबई 👉मोहन भारती
महाराष्ट्र शासनाच्या हवामान विभागाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, पुढील २४ तासांत विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आणि गडगडाटी वादळ होण्याची शक्यता आहे.
राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि सुरक्षित स्थळी थांबण्याचे आवाहन केले आहे. तसेच, विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली थांबणे, उघड्यावर फोन वापरणे किंवा धातूच्या वस्तू हाताळणे टाळावे.
🛑 सतर्क राहा – सुरक्षित राहा!
📎 स्रोत: मंत्रालय, मुंबई (हवामान विभाग)