गडचांदूर – खुर्द वणी बस तात्काळ सुरू करा : सुबोध चिकटे

By : लोकदर्शन जिवती 

जिवती : चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती हा,तालुका चंद्रपूर जिल्ह्यातील आतीदुर्ग भागातला तालुका असून,या तालुक्यात गडचांदूर पासून,येलापूर ते,वनी खुर्द पर्यंत,जाणारी लाल परी ही, बस पूर्वी चालू होती, परंतु मागील काही दिवसापासून गडचांदूर ते जिवती येलापूर या, मार्गाने वनी येथे मुक्काम राहत होती,ती आता काहीक,महिन्यापासून बंद असल्यामुळे त्या मार्गावरील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, या समस्याचे गांभीर्य लक्षात घेऊन, तालुक्यातील युवा कार्यकर्ता सुबोध चिकटे, यांच्या नेतृत्वात माननीय परिवहन नियंत्रक चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ जिल्हा चंद्रपूर यांना एका निवेदनाद्वारे समस्या मांडली असता, सदर अधिकाऱ्याने एक जुलै,पासून सदर बस चालू करून विद्यार्थ्यांसाठी लागू असलेले सर्व योजना महामंडळा द्वारे नियोजन करण्यात येईल असे आश्वासन दिले यावर सुबोध चिकटे यांनी प्रतिप्रश्न करून हे आश्वासन हे हवेत जाऊ नये,व तात्काळा गडचांदूर ते, जिवती येलापूर मार्ग वनी खुर्द,ला बस तात्काळ सुरू करण्यात यावे असे विनंती करण्यात आली,

▪️ एक जुलै पासून नियमित पने बस सेवा सुरु राहील, ति रात्रेची बस विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे,
*आस्थापना पर्यवेक्षक अधिकारी वर्ग २कनिष्ट -गायत्री कुंडे*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here