ग्रामपंचायत नोकारी खु.येथे तहसील कार्यालय राजुऱ्याच्या वतीने महाराजस्व,शासन आपल्या दारी या शिबीराचे आयोजन करण्यात आले

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

आदिवासी व ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांना तहसील कार्यालयात फेरफटका मारावे लागते व एका कामासाठी अनेक अधिकाऱ्यांची मंजुरी घ्यावी लागत असल्याने कामास विलंब होतो. व काही लोकांना शासकीय कामाची माहीती तसेच शासकीय विविध योजनांची माहीती नसल्याने दलाला कडुन फसवणूक सुध्दा होते. हे टाळने व सर्व अधिकाऱ्यांना एकाच टेबलवर आनुन कामे तात्काल निकाली काडने ह्य हेतुने वारसाची नोंद घेने, हीस्से वाटनी, फेरफार नोंद घेने संजय गांधी निराधार, श्रावण बाळ वृद्धापकाळ योजनां, राशन कार्ड, कृषी व पशु तसेच पंचायत समीती आरोग्य व महीला बाल कल्याण विभागाच्या वयक्तीक लाभाच्या योजनांची माहीती तसेच अर्ज स्वीकारने असी अनेक कामे करण्यात आली व नोकारी खु. नोकारी बु. बाम्बेझरी व मानोली ,जामनी, बैलमपुर येथील लोकांनी याचा लाभ घेतला.
यावेळी मा.श्री.गांगुर्डे साहेब नायब तहसीलदार राजुरा, साळवे साहेब मंडळ अधिकारी विरुर विभाग,वडस्कर साहेब तलाठी साझा ईसापुर,श्री. गेडाम साहेब अन्न पुरवठा विभाग, मोते माॅडम वैद्यकीय अधिकारी देवाळा,कृषी अधिकारी साहेब, सौ. मनिषा पेंदोर सरपंच नोकारी खु. श्री. वामन मा.तुरानकर ऊपसरपंच नोकारी खु. श्री. वासेकर ग्रामसेवक नोकारी खु.शीवमुर्ती गायलाड ग्रा.प सदस्य, लताताई ऊईके ग्रा.प सदस्य, ममताताई नागोसे ग्रा.प सदस्य, सीमाताई गाऊत्रे,संजय कन्नाके ग्रा.पसदस्य, राकेश भगत पो.पाटील नोकारी बु. रमेश नैताम, साधनाताई नागोसे पो.पाटील बाम्बेझरी,साधनाताई बतकी आंगनवाडी सेविका,भगतताई आंगणवाडी सेविका, बोरूलेताई आंगणवाडी सेविका, सिंधुताई हजारे आंगणवाडी मदतणीस हे ऊपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here