Home
Home गडचांदूर / कोरपणा नागपूर विद्यापीठात गौरी भारती यांची NSUI युनिट अध्यक्षपदी नियुक्ती

नागपूर विद्यापीठात गौरी भारती यांची NSUI युनिट अध्यक्षपदी नियुक्ती

< लोकदर्शन 👉 शंकर तडस नागपूर : राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (NSUI) तर्फे राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात गौरी भारती यांची युनिट अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती NSUI चे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद जाखड तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सागर सालुंके यांच्या मान्यतेने करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष आयुष धनराज नवले यांनी दिलेल्या नियुक्तीपत्रानुसार, गौरी भारती यांची नियुक्ती तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविणे, त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवणे तसेच संघटनेला अधिक बळकट करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. यावेळी NSUI तर्फे गौरी भारती यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या असून विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्या प्रभावीपणे काम करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here