लोकदर्शन जिवती : प्रा. गजानन राऊत
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, जिवती येथे महिला सक्षमीकरण विभागाच्या वतीने “स्त्री सक्षमीकरण : आजची गरज आणि वास्तव” या विषयावर भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे समन्वयन डॉ. वैशाली डोर्लीकर यांनी केले.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एस. एच. शाक्य यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी स्त्री सक्षमीकरणाचे सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक पैलू प्रभावीपणे मांडत आजच्या काळातील स्त्रीची भूमिका, आव्हाने आणि संधी यांचे सखोल विवेचन केले.
स्पर्धेत दिव्या गायकवाड हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर पलक सरोदे हिने द्वितीय क्रमांक मिळवला. तृतीय क्रमांक संयुक्तपणे आशिष पवार आणि संदीप आडे यांना प्रदान करण्यात आला. प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून इतिहास विभाग प्रमुख डॉ. श्रीकांत पानघाटे यांनी विद्यार्थ्यांच्या विचारमांडणी, आत्मविश्वास आणि विषयाच्या समजुतीचे मूल्यमापन केले. कार्यक्रमाचे प्रभावी संचालन प्रा. गणेश कदम यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. योगेश खेडेकर यांनी मनोगत व्यक्त करत महिला सक्षमीकरण ही केवळ संकल्पना नसून सामाजिक परिवर्तनाची दिशा असल्याचे प्रतिपादन केले.
या प्रसंगी विचारमंचावर डॉ. परवेज अली, प्रा. सचिन यनगंदलवार, प्रा. संजय मुंडे आणि प्रा. सचिन शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्त्री-पुरुष समानतेबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होण्यास मदत झाली. तसेच विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कौशल्याचा विकास, सामाजिक प्रश्नांबाबत जागरूकता आणि स्त्री सक्षमीकरणाविषयी संवेदनशील दृष्टिकोन निर्माण होण्यास या कार्यक्रमाचा मोलाचा फायदा झाला. महाविद्यालयात सामाजिक मूल्यांवर आधारित विचारमंथनाची परंपरा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. विद्यार्थ्यांचे प्रभावी विचारमंथन”
लोकदर्शन जिवती : प्रा. गजानन राऊत
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, जिवती येथे महिला सक्षमीकरण विभागाच्या वतीने “स्त्री सक्षमीकरण : आजची गरज आणि वास्तव” या विषयावर भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे समन्वयन डॉ. वैशाली डोर्लीकर यांनी केले.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एस. एच. शाक्य यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी स्त्री सक्षमीकरणाचे सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक पैलू प्रभावीपणे मांडत आजच्या काळातील स्त्रीची भूमिका, आव्हाने आणि संधी यांचे सखोल विवेचन केले.
स्पर्धेत दिव्या गायकवाड हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर पलक सरोदे हिने द्वितीय क्रमांक मिळवला. तृतीय क्रमांक संयुक्तपणे आशिष पवार आणि संदीप आडे यांना प्रदान करण्यात आला. प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून इतिहास विभाग प्रमुख डॉ. श्रीकांत पानघाटे यांनी विद्यार्थ्यांच्या विचारमांडणी, आत्मविश्वास आणि विषयाच्या समजुतीचे मूल्यमापन केले. कार्यक्रमाचे प्रभावी संचालन प्रा. गणेश कदम यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. योगेश खेडेकर यांनी मनोगत व्यक्त करत महिला सक्षमीकरण ही केवळ संकल्पना नसून सामाजिक परिवर्तनाची दिशा असल्याचे प्रतिपादन केले.
या प्रसंगी विचारमंचावर डॉ. परवेज अली, प्रा. सचिन यनगंदलवार, प्रा. संजय मुंडे आणि प्रा. सचिन शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्त्री-पुरुष समानतेबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होण्यास मदत झाली. तसेच विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कौशल्याचा विकास, सामाजिक प्रश्नांबाबत जागरूकता आणि स्त्री सक्षमीकरणाविषयी संवेदनशील दृष्टिकोन निर्माण होण्यास या कार्यक्रमाचा मोलाचा फायदा झाला. महाविद्यालयात सामाजिक मूल्यांवर आधारित विचारमंथनाची परंपरा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.