लोकदर्शन 👉महादेव गिरी
सेलू येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय, सेलू येथे विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचा संयुक्त मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती व कै. विनायकराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य धनंजय भागवत होते. यावेळी दशरथ कांबळे, रामदास रोडगे, अंकुश राऊत, अशोक पौळ, अश्विनी नाडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष कुलकर्णी यांनी केले. यावेळी दत्तात्रय सोळंके, रामदास रोडगे, दामिनी पथकाच्या अस्मिता मोरे, प्रनयना तेलगोटे, रामेश्वर गाडेकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच किंजल कांबळे, अश्विनी शिंदे, प्रणाली राऊत, सचिन कसबे व अदित्य शिंदे या विद्यार्थ्यांनी शाळेविषयी आपले विचार मांडून अनुभव कथन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तोटेवाड जी. के. यांनी केले, तर आभारप्रदर्शन धनंजय मोरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील मोरे, एस. आर. रोंटेवाड, बाबासाहेब आव्हाड, नारायण काष्टे, अंगद मोरे व विष्णू गजमल यांनी विशेष परिश्रम घेतले.
या मेळाव्यास शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





