लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा ( :— गडचांदूर शहरातील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्त्यांनी आज जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या प्रभावी नेतृत्वावर व काँग्रेस पक्षाच्या जनहितैषी विचारसरणीवर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
या प्रवेश सोहळ्यात संतोष झाडे, प्रशांत निरंजने, बबन घोटकर, दिलीप शेटे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला.
जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे यांच्या राजुरा येथील जनसंपर्क कार्यालयात या सर्व नव्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसच्या दुपट्ट्याने सत्कार करून पक्षात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी गडचांदूर शहर काँग्रेसचे संजय मेंढी, सुनील झाडे, महादेव हेपट, मकसूद अली, प्रीतम सातपुते यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नव्या कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे गडचांदूर शहर काँग्रेसची संघटनात्मक घडी अधिक मजबूत होऊन स्थानिक पातळीवर पक्षाच्या जनआधारात वाढ होणार असल्याचा विश्वास जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे यांनी व्यक्त केला.