✈️ चंद्रपूरच्या विकासाला नवी पंखे! मोरवा विमानतळ ‘उडान’ योजनेत सामील करण्यासाठी आ. मुनगंटीवार यांचा पाठपुरावा ♦️चंद्रपूर प्रतिनिधी | लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन चंद्रपूर 👉मोहन भारती

चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने आणि विदर्भातील औद्योगिक, पर्यटन व आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत राज्याचे माजी मंत्री व आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्र सरकारकडे ठोस मागणी केली आहे.

आ. मुनगंटीवार यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजरापु नायडू यांना पत्र लिहून मोरवा विमानतळाला ‘उडान योजना’मध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. तसेच चंद्रपूर–मुंबई–पुणे–दिल्ली अशा प्रमुख महानगरांदरम्यान विमानसेवा सुरू करण्याची विनंती केली आहे.

आ. मुनगंटीवार यांनी नमूद केले आहे की, चंद्रपूर हा राज्यातील औद्योगिक दृष्ट्या अग्रगण्य जिल्हा असून येथे कोळसा, वीज, सिमेंट, पेपर व बांबू उद्योगांचे प्रचंड जाळे आहे. चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन, बल्लारपूर पेपर मिल, फेरो अलॉयज, धारीवाल व वर्धा पॉवर यांसारख्या प्रकल्पांमुळे या जिल्ह्याला राष्ट्रीय ओळख प्राप्त झाली आहे. मात्र, हवाई संपर्काच्या अभावामुळे उद्योग, अधिकारी व नागरिकांना नागपूरवर अवलंबून राहावे लागते, ज्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढतात.

मोरवा विमानतळ हे चंद्रपूर शहरापासून फक्त 9 किमी अंतरावर असून सध्या तेथे C90, AB200, CJ1 विमाने आणि सर्व प्रकारची हेलिकॉप्टर्स उड्डाण करू शकतात. फक्त 700 मीटर धावपट्टीचा विस्तार केल्यास प्रवासी विमानसेवा सुरू होऊ शकते. त्यामुळे हा प्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here