लोकदर्शन👉शिवाजी सेलोकर
घुग्घुस : येथील प्रयास सभागृहात रविवारी प्रयास सखी मंच घुग्घुस तर्फे आयोजित दादाचा दांडिया उत्सव–२०२५ अंतर्गत दांडिया व गरबा नृत्य स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
सलग सातव्या वर्षी होत असलेल्या या दांडिया उत्सवाचे उद्घाटन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा घुग्घुसचे भूमिपुत्र देवराव भोंगळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
या प्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, प्रमुख अतिथी चिन्नाजी नलभोगा, युवा नेते अमोल थेरे, माजी पं. स. उपसभापती निरीक्षण तांड्रा, जिल्हा सचिव विनोद चौधरी, शिवसेना शहराध्यक्ष महेश डोंगे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष श्रीनिवास गोसकूला यांच्यासह विविध पक्षांचे मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेत एकूण ४१९ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. युवती व महिला गटासाठी रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एलईडी टीव्ही, ट्रॉफी तसेच लकी ड्रॉमध्ये पैठणी साडी, मिक्सर, मोबाईल, हॉटस्पॉट, टिफिन आदी आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली होती.
विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजिका अर्चना भोंगळे, अध्यक्षा किरण बोढे यांच्यासह प्रयास सखी मंचच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.