जिवतीचे प्रा. गजानन राऊत यांचे ‘इसादास भडके : व्यक्ती आणि वाड्मय’ ग्रंथाचे चंद्रपूरात प्रकाशन

लोकदर्शन 👉 मोहन भारती

चंद्रपूर : दिनांक 23 सप्टेंबर
आंबेडकर साहित्य प्रबोधिनी, चंद्रपूर यांच्या वतीने प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित कार्यक्रमात विदर्भ महाविद्यालय, जिवती येथील मराठी विभागप्रमुख डॉ. गजानन राऊत यांच्या संशोधनपर ग्रंथाचे — ‘इसादास भडके : व्यक्ती आणि वाड्मय’ — प्रकाशन मोठ्या उत्साहात पार पडले.

इसादास भडके यांच्या साहित्यिक योगदानाबाबत सखोल चिकित्सक अभ्यास करून हा ग्रंथ डॉ. राऊत यांनी सिद्ध केला आहे. भडके यांच्या लेखनातून ग्रामीण जीवनाची वास्तवता, वंचित घटकांचे प्रश्न आणि मानवी मूल्यांची जपणूक ठळकपणे अधोरेखित होते. ते केवळ साहित्यिक नव्हते, तर सामाजिक विचारवंत आणि संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून समाजासमोर उभे राहतात, असे मान्यवरांनी या प्रसंगी सांगितले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पी. डी. निमसरकार होते तर उद्घाटन डॉ. वामन गवई यांच्या हस्ते झाले. यावेळी कवी लोकनाथ यशवंत, प्राचार्य डॉ. देवेश कांबळे, श्री. देशक खोब्रागडे, डॉ. इसादास भडके, सौ. भडके, मार्गदर्शक डॉ. राजकुमार मुसणे, डॉ. धनराज खानोरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

ग्रंथ प्रकाशनानंतर उपस्थितांनी डॉ. राऊत यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून साहित्यप्रेमींना या ग्रंथाचा नक्कीच भरभरून प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाचे संचालन शुध्दोधन मेश्राम यांनी केले तर आभार नागेश सुखदेवे यांनी मानले.
शेवटी अनिरुद्ध वनकर लिखित ‘घायाळ पाखरा’ या नाटकाचा प्रभावी प्रयोग सादर करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here