⭐ समाजप्रबोधनासाठी सेवाभावी संस्था मोठं कार्य करू शकतात – उद्योगमंत्री उदय सामंत ⭐

लोकदर्शन रत्नागिरी (प्रतिनिधी – महेश्वर भिकाजी तेटांबे)

महाराष्ट्रातील सेवाभावी संस्थांना सक्षम करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेविका, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या डॉ. सौ. सुनीताताई मोडक यांनी “सेवाभावी संस्था प्रबोधन समिती” ची स्थापना केली असून, या समितीच्या उदघाटनाचा सोहळा उद्योगमंत्री सन्माननीय श्री. उदयजी सामंत यांच्या हस्ते पार पडला.

या प्रसंगी बोलताना मंत्री सामंत म्हणाले, “सेवाभावी संस्था या नावातच सेवाभाव दडलेला आहे. राजकीय रंग न देता जर आपण सेवाभाव जपला, तर या संस्था समाजप्रबोधनाचे मोठे कार्य करू शकतात.”

ते पुढे म्हणाले, “रत्नागिरी ही अशी भूमी आहे की इथं सुरू झालेलं कोणतंही कार्य अर्धवट राहत नाही. सेवाभावी संस्था जर पक्षविरहित राहून समाजहितासाठी काम करतील, तर समाजातील गैरसमज, अन्याय व राजकीय हेतूंसाठी उभारल्या जाणाऱ्या चळवळींवर प्रकाश टाकण्याची ताकद त्यांच्यात आहे. माझं राजकारण देखील सेवाभावी संस्थेतूनच सुरू झालं आहे. समाजकारणातून मिळालेला जनतेचा विश्वासच मला पुढे जाण्याची ताकद देतो.”

🔸 समितीची रचना:
डॉ. सुनीताताई मोडक या राज्य अध्यक्षा असून, प्रकोष्ठ समितीची धुरा सौ. शालिनीताई ठाकरे यांनी स्वीकारली आहे. कार्याध्यक्षा अनिता तीपायले, सचिव लक्ष्मण डोळस, खजिनदार डॉ. सतीश जगताप, सहसचिव प्रताप पवार, प्रमुख सल्लागार बाळाभाऊ फाटक अशा जंबो कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. कोकण, नाशिक, नागपूर, अमरावती, संभाजीनगर, पुणे अशा सहा विभागांत समित्यांची रचना करण्यात आली आहे.

🔸कार्यक्रमाचे वैशिष्ट्य:
या सोहळ्याला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, उद्योजक, समाजसेवक, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चित्रपट निर्माते व प्रबोधन समितीचे राज्य सदस्य शरददादा उगले यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here