गुणवंत विद्यार्थ्यांचा सरस्वती सेवा प्रतिष्ठानतर्फे सन्मान

लोकदर्शन वालूर 👉महादेव गिरी

वालूर येथील सरस्वती सेवा प्रतिष्ठानचे संचालक शंतनू पाठक यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सन्मान समारंभ गुरुवार, दि. १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता श्री. संत सावता महाराज सभागृहात संपन्न झाला.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिवाजीराव पाठक होते. प्रमुख पाहुणे म्हणून महेशराव खारकर, भागवत कुमठेकर, प्रा. विशाल पाटील व प्रकाश कुरुंदकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच सद्गुरू दूंढा महाराज वारकरी शिक्षण संस्थेला मदत करणाऱ्या मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल पितळे व तनुजा मस्के यांनी केले. आभार प्रदर्शन राजेश कटारे यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन शंतनू पाठक, पार्वती तळेकर, सोनाली तळेकर, पूजा रोकडे, दुर्गा आगलावे व संदीप गोरे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एकनाथ कटारे, शिवरानी शिंदे, कोमल पितळे, रोहिणी सारुक, अनुसया धापसे, आयेशा शेख, प्रदीप ढाकणे, अरुणा गडदे, आलिया शेख, नवनाथ रोकडे, प्रथमेश उबाळे, भागवत रोकडे, योगेश बालाटकर, माऊली धापसे, विष्णू नवघरे यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here