By : Shankar Tadas
गडचांदूर :
कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया सन २०२५-२६ अंतर्गत गडचांदूरातील बालाजी सेलिब्रेशन सभागृहात एकदिवसीय उपविभागीय सोयाबीन कार्यशाळा घेण्यात आली. उदघाटक म्हणून आमदार देवराव भोंगळे उपस्थित होते.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचा विकास साधण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक आहे. सरकारच्या विविध योजना आणि तंत्रज्ञानाचा लाभ घेत शेतकरी अधिक समृद्ध होऊ शकतो. कृषी क्षेत्रात अमुलाग्र बदल झाल्याने त्याचा मोठा फायदा शेतीच्या उत्पादन वाढीवर होतांना दिसतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन आधुनिक शेती करावे असे आवाहन यावेळी आमदार भोंगळे यांनी मार्गदर्शनातून केले.
यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी विश्वास जाधव, कोरपना तालुका भाजपा महामंत्री सतिश उपलेंचवार, राजुरा तालुका कृषी अधिकारी विनायक पायघन, सचिन पानसरे, गोविंद ठाकूर, माधुरी गावंडे, श्रीकांत अमरशेट्टीवार, निखिल भोंगळे, अशोक झाडे, महेश घरोटे, निलेश भिवापूरे यांचेसह राजुरा उपविभागातील कृषी अधिकारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.