स्व. कालीदास अहीर स्मृतीदिनानिमित्त 12 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबिर ♦️चंद्रपूरच्या जैन भवन सभागृहात सकाळी 9 वाजता प्रारंभ; अहीर परिवार, कमल स्पोर्टींग क्लब व मित्रपरिवाराचे आयोजन

लोकदर्शन चंद्रपूर 👉शिवाजी सेलोकर

चंद्रपूर – मा. हंसराजजी अहीर यांचे कनिष्ठ बंधु, तसेच सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्त्व व कमल स्पोर्टींग क्लबचे संस्थापक स्व. कालीदास गं. अहीर यांच्या स्मृतीदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर दि. 12 ऑगस्ट 2025 रोजी, सकाळी 9 वाजल्यापासून जैन भवन सभागृह, पठाणपुरा रोड, चंद्रपूर येथे होणार आहे. शिबिरात रक्तदाते, भाजप, भाजयुमो, ओबीसी व इतर मोर्चाचे पदाधिकारी, महिला आघाडी तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

या उपक्रमाचे आयोजन अहीर परिवार, कमल स्पोर्टींग क्लब आणि कालीदास अहीर मित्रपरिवार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here