रक्षाबंधनाच्या पवित्र धाग्याने नात्यांना दिले अतूट बळ — आमदार सुधीर मुनगंटीवार 🌼मुल तालुका भाजपाच्या वतीने उत्साहात साजरा रक्षाबंधन सोहळा

लोकदर्शन 👉 मोहन भारती

चंद्रपूर, दि. 9 — “रक्षाबंधनाचा पवित्र धागा हा प्रेम, विश्वास आणि नात्यांच्या अद्वितीय बंधाचा प्रतीक आहे. माझ्या लाडक्या बहिणींच्या प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर मी पूर्ण शक्तीने पाठीशी उभा राहीन,” असा ठाम निर्धार राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

रामलीला सभागृह, मुल येथे भाजपा मुल तालुक्याच्या वतीने आयोजित रक्षाबंधन सोहळ्यात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत बहिणींनी राखी बांधून आमदार मुनगंटीवार यांच्याप्रती आपुलकी व्यक्त केली. कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले, प्रदेश महामंत्री अल्काताई आत्राम, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदनाताई शेंडे यांच्यासह तालुका व शहर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार मुनगंटीवार यांनी बहिणींसाठी राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती देताना सांगितले की, बल्लारपूर विधानसभेत एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे उपकेंद्र, स्व. सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्र, चंद्रपूर फ्लाईंग क्लबमधील शैक्षणिक आरक्षण, आरोग्य शिबिरे आणि विविध कल्याणकारी योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू आहेत.

रक्षाबंधन निमित्त शूरवी महाविद्यालय, मुल येथे राखी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थिनींनी स्वतःच्या हस्तकौशल्यातून तयार केलेल्या सुंदर राख्या बांधून या बंधनाला अलौकिक सन्मान दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here