By : Shankar Tadas
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्याला लाभलेले इतिहास संशोधक, ज्येष्ठ नाणे संग्राहक चंद्रपूर येथील अशोक सिंह ठाकूर यांना ‘श्री शिवसन्मान पुरस्कार 2025 ‘ जाहीर करण्यात आला आहे.
भारताच्या नाणे इतिहासातील संग्रह आणि संशोधन क्षेत्रामध्ये त्यांचे कार्य मोलाचे व उल्लेखनीय आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन, त्यांना यंदा होणाऱ्या ‘ जागर शिवराजाभिषेकाचा’ या कार्यक्रमात
‘ श्री शिवसन्मान पुरस्कार २०२५ ‘ देऊन गौरवण्यात येणार आहे. या सोहळ्या चे आयोजक श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड असून २० जुलै २०२५ रोजी सकाळी ९.०० ते दु. २.०० या वेळेत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर (पश्चिम) – २८ येथे पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे.