By : Shankar Tadas
राजुरा : गावखेड्यापर्यंत कॉन्व्हेंटचा प्रसार झाल्याने जि. प. शाळांना आवश्यक विद्यार्थीसंख्या राखणे कठीण होत आहे. अशा वेळी ग्रामपंचायतीने पुढाकार घेत गावच्या जि. प. शाळेत विद्यार्थी संख्या वाढावी यासाठी खास ऑफर दिली आहे. राजुरा तालुक्यातील कढोली बु. ग्रामपंचायतीने हा उपक्रम राबविला आहे. जे पालक आपलं मूल पहिलीला गावच्या जि. प. शाळेत पाठवतील त्यांचे पाणीकर व गृहकर माफ करणार असल्याचे नोटीस काढण्यात आले आहे. सोशल मीडियात या पत्रकाची चर्चा होत असून ग्रामपंचायतीच्या या खास ऑफरचा विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी किती लाभ होतो, याकडे इतर ही शाळांचे लक्ष लागले आहे.