By : Shankar Tadas
कोरपना :
राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार देवराव भोंगळे यांनी आपल्या कार्यशैलीने संपूर्ण विधानसभा क्षेत्रात कामाचा झंझावत निर्माण केला आहे. जनसामान्य माणसाचे प्रश्न तात्काळ सुटावे हा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. त्याचमुळे ते रोज सकाळी आपल्या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार भरवीत असतात,हे प्रश्न आणखी तळागाळातील नागरिकांचे सुटावे याकरिता आमदार देवराव भोंगळे यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रात प्रथमच अभिनव उपक्रम राबवित आमदार आपल्या दारी गाव भेट दौऱ्याचे नियोजन कोरपना तालुक्यातील गावांमध्ये केलेले आहे. या दौऱ्याची सुरुवात त्यांनी कोरपना तालुक्यातील नारंडा या गावातून केली.
यामध्ये ग्रामसेवक, मंडळ अधिकारी,तलाठी,कृषी विभाग, बांधकाम विभाग,आरोग्य विभाग ,वन विभाग,विद्युत वितरण विभाग,पोलीस स्टेशन,ग्रामीण पाणी पुरवठा विभाग इत्यादी विभागाचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांच्या तक्रारी ऐकून संबंधित विभागाला त्वरित सूचना आमदारांनी केल्या. अशा प्रकारे नागरिकांचे विकासासंदर्भात व समस्यासंदर्भात प्रश्न सोडविण्यात येत असल्याने जनतेत समाधान व्यक्त होत आहे.
२८ जून रोजी कोरपना तालुक्यातील नारंडा माथा,शेरज खुर्द,शेरज बू,हेटी, कोडशी खुर्द,तांबाडी,कोडशी बू, गांधीनगर इत्यादी गावात भेट दिली.यावेळी गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.