By : Shankar Tadas
चंद्रपूर (भद्रावती) : ग्रामीण पत्रकारितेला शहराचे ग्लॅमर नाही, एक प्रकारे ग्रामीण पत्रकारिता आव्हानात्मकही आहे. आताच्या परिस्थिती ग्रामीण पत्रकारांनी स्थानिक विषयांना वैश्विक आयाम देण्याचे काम केले पाहिजे, असे प्रतिपादन ‘सर्च’ संस्थेचे संचालक, पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी केले.
अखिल भारतील ग्रामीण पत्रकार संघाने आयोजित केलेल्या दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते. ‘काळानुरूप बदलती पत्रकारिता आणि आव्हाने’ या सत्राचे उद्घाटने त्यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी साहित्यिक डॉ. विनायक तुमराम होते.
डॉ. बंग म्हणाले, “गावसंस्था आणि निसर्गाशी घट्ट नाते असणारी पत्रकारिता म्हणजे ग्रामीण पत्रकारिता होय. पत्रकारिता ग्रामीण पण युग मात्र वैश्विक अशी सध्याची स्थिती आहे. अशा विश्वग्रामात पत्रकारिता गावाला वैश्विक स्तरावरही पोहोचवू शकते.”
ते म्हणाले, “महात्मा गांधी यांनी सुशिक्षित वर्गाचे लक्ष खेड्यांकडे वळवले, त्यांची खेड्यांबद्लची निष्ठा विलक्षण होती, त्यामुळे महात्मा गांधीजीं ग्रामीण पत्रकारितेची प्रेरणा आहेत. तर मार्शल मॅक्लुहन यांनी माध्यमांतील बदल फार पूर्वीच ओळखले होते. ग्रामीण पत्रकारांनी स्थानिक प्रश्नांना वैश्विक व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे. पत्रकारिता करताना सत्याला घेऊन एकटे उभे राहाण्याची हिंमत हवी, कारण सत्याची स्वतःची ताकद असते.”
डॉ. बंग यांनी चंद्रपुरातील दारूबंदी कशी उठवण्यात आली आणि त्याचे दुष्पपरिणाम काय होत आहेत, यावर प्रखड भाष्य केले. तसेच गडचिरोलीतील खाणकामामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा उहापोह केला.
डॉ. विनायक तुमराम म्हणाले, “दुःख वेचन्याची जबाबदारी ग्रामीण पत्रकारांनी घेतली पाहिजे. माणसाला विनाशापासून वाचवू शकेल ती खरी पत्रकारिता. दुर्दैवाने आजची पत्रकारिता ही श्रीमंत आणि भांडवलदारांच्या हाती गेली आहे.”
पत्रकारिता करीत असताना पत्रकारांना अनेक अडचणी येतात. पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी मी नेहमी प्रयत्न रत असतो. या अधिवेशनामध्ये पत्रकारांचे मांडलेले ठराव, प्रस्तावित मागण्या सोडवण्यासाठी पूर्ण शक्तीने उभा राहील असे आश्वस्त करतो असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ३ व
४मे रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील राजमनी गार्डन व लाँन ,रेल्वे स्टेशन रोड, भद्रावती येथे पत्रकारांचे दोन दिवसीय खुले राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित केले होते. या अधिवेशनात आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री प्रा.डॉ. अशोक उईके
उद्घाटक म्हणून ऑनलाइन प्रणाली द्वारे दारे शुभेच्छा दिल्या तर माजीअर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ऑनलाइन प्रणाली द्वारे उपस्थित राहून अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने अधिवेशन व्यासपीठ अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख, मिशन आयएएस
चे संचालक प्रा.नरेशचंद्र काठोळे , शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय, नागपूरचे अधिष्ठाता प्रा .डॉ.विश्वनाथ साबळे, नेत्र तज्ञ डॉ. चेतन खुटेमाटे, फेडरेशन ऑफ असोसिएशनचे मधुसूदन रूंगठा, जनमंच अध्यक्ष राजीव जगताप, सामाजिक कार्यकर्ते राम आखरे, आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पित करून दीप प्रज्वलित करण्यात येऊन चंद्रपूर जिल्ह्याच्या आदिवासी सांस्कृतिक वेशभूषेत नृत्याने करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख यांनी प्रास्ताविक करीत संघटनेची माहिती दिली तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात राज्य स्तरीय खुले अधिवेशन घेण्यामागची पार्श्वभूमी कार्यक्रमाचे संयोजक रवींद्र तिराणिक यांनी मांडली. संस्थापक अध्यक्ष मनोहर सुने यांनी गेल्या ३०वर्षा पासून अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ पत्रकारांच्या विविध मागण्यासाठी लढा देत आहो. काही मागण्या मान्य झाल्या असून, बऱ्याच मागण्या प्रलंबित आहेत त्यामुळे प्रलंबित मागण्यासाठी यापुढे आंदोलन सुद्धा उभारू असे मत त्यांनी व्यक्त केले. यानंतर मंचावरील उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. द्वितीय सत्रात ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. अभय बंग, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ,आदिवासी साहित्यिक व विचारवंत प्रा डॉ.विनायक तुमराम, ज्येष्ठ साहित्यिका उषा किरण आत्राम आदींची उपस्थिती होती. या दरम्यान राज्यस्तरीय अधिवेशनाला समर्पित
“फ्रेम “स्मरणिकेचा मुखपृष्ठाचा प्रकाशन सोहळा पार पडला पडला. प्रसंगी अधिष्ठाता ,डॉ.विश्वनाथ साबळे, मराठी अभिनेते नाट्यकलावंत रमेश थोरात, प्रा.सदानंद बोरकर, प्रा .पंकज इटकेलवार, प्रा .विकास जोशी, देवानंद साखरकर प्रा.शाम हेडाऊ ,परमानंद तिराणिक, शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय नागपूर विद्यार्थी कला ग्रुप यांनी राज्य अधिवेशन स्तरावरून लाईव्ह चित्रकला रेखाटन करून सगळ्यांचे लक्ष वेधत कला प्रदर्शनी साकारली. याबद्दल सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रसंगी उपस्थित मान्यवरांना विविध रेखाटन व पेंटिंग केलेली कला चित्र, कलाकृती लँडस्केप कु .स्वरा -कल्याणी बोंडे या कला अकादमीच्या चिमुकल्या विद्यार्थिनींनी मान्यवरांना भेट दिल्या.
तृतीय सत्राच्या अध्यक्षस्थानी किशोर जोरगेवार तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी (गडचिरोली), सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर भडांगे, ताकसांडे, किशोर पत्तीवार ,अ.भा. ग्रा.पत्रकार संघाचे केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे, प्रदीप जोशी, सचिव अशोक पवार, अशोक यावुल, प्रा .रवींद्र मेंढे, बाबाराव खडसे, बाळासाहेब सोरगिवरकर, अभिमन्यू भगत, अँड. किरण भुते, माणिकराव ठाकरे, रमाकांत मोरे, केंद्रीय संपर्कप्रमुख, (मध्य प्रदेश प्रदेश) सल्लागार अरुण कुलथे, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र ठाकरे, प्रदेश सचिव गोपाल सरनायक, प्रदेश कार्यालय प्रमुख मंगेश राजनकार, मनोज कामटे प्रदेश संघटक, महिला मंच प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. मंजुषा सागर, प्रदेश सरचिटणीस सौ कांचन मुरके, प्रसिद्धी प्रमुख शहजाद खान, आदींची उपस्थिती होती. यावेळी महिला मंच कार्यकारणी घोषित करण्यात आली. व सत्कार सोहळा पार पडला. चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या भाषणातून पत्रकारांच्या समस्या शासन दरबारी मांडून त्याचा पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले. सदर अधिवेशनाचे मुख्य संयोजक महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख रवींद्र तिराणिक होते, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ३ मे रोजी रात्री ७ वाजता, नट श्रेष्ठ निळू फुले फाउंडेशन , अकोला प्रस्तुत ब्लॅक कॉमेडी एकपात्री “बकरी शेर खा गई” चा प्रयोगाचे सादरीकरण दिग्दर्शक लेखक मराठी चित्रपट अभिनेते डॉ.रमेश थोरात यांनी केले. परमानंद
तिरानीक यांनी एकपात्री नाटकाचे सादरीकरण केले. या अधिवेशनाला संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिवेशनाच्या यशस्वीते करता, चंद्रपूर जिल्ह्यातील अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, सहयोगी पत्रकार मित्र मंडळ, आम्ही चंद्रपूर भद्रावतीकर मित्र मंडळ सहयोगी सेवा संस्था पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले याबद्दल मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणी निवेदिका सह्याद्री वाहिनी मुलाखतकार प्रज्ञा नंदराज जीवनकर, संयोजक रवींद्र तिराणिक, तर आभार प्रदर्शन रवींद्र मेंढे यांनी केले.