By : Devanand Sakharkar
चंद्रपूर :
देश-विदेशात आपल्या कलेतून नावलौकिक मिळविलेल्या चंद्रपुरातील अंकिता नवघरे या अभियंता युवतीने साकारली चंद्रपूरचा शहराचा ऐतिहासिक वारसा असलेल्या जेटपुरा गेट ची हुबेहूब कलाकृती.
जटपूरा गेट हा चंद्रपूर शहरातील एक ऐतिहासिक द्वार आहे, जो 16व्या शतकात गोंड राजवंशाच्या काळात बांधला गेला. हा गेट चंद्रपूरच्या प्राचीन किल्ल्याचा भाग होता, जो त्या काळात संरक्षणात्मक संरचना म्हणून उभारला गेला होता. जटपूरा गेटचा वापर किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराप्रमाणे केला जात असे, ज्यामुळे शत्रूंपासून संरक्षण मिळत असे.
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गणेशोत्सव जोमाने साजरा केला जात असून, घरो-घरी सर्वांच्या बाप्पांचे आगमन झाले, यात प्रत्येक गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी निरनिराळे देखावे साकारत असतो. मात्र अंकिता नवघरे या अभियंता युवतीने चंद्रपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि सुप्रसिद्ध वास्तू जेटपुरा गेटची हुबेहूब कलाकृती सादर केली, विशेष म्हणजे ही कलाकृती साकारतांना अंकिताने १००% पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर केला असून सदर देखावा बघतांना गणपती बाप्पा खरोखरचं जेटपुरा गेट मध्ये विराजमान असल्याचे जाणवते.
अंकिताने यापूर्वीही अनेक प्रदर्शनात आपले नाव लौकिक केले आहे. B.Tech चं शिक्षण पूर्ण करून उत्तम दर्जाची नौकरी सोडत अंकिताने स्वतःच्या छंदाचे व्यवसायात रूपांतर केले. अंकिताने तयार केलेल्या पेंटिंग देश-विदेशात विकल्या जातात.
देश-विदेशातील पुरस्कार प्राप्त करणाऱ्या अंकिताच्या कामाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने देखील घेतली आहे. स्क्रू पेंटिंग, कॅनव्हास पेंटिंग, रेझिन आर्ट सारख्या कामात अंकिताचा हातखंडा आहे.
अंकिताला विचारले असता तिचा पुढील मोठा प्रकल्प रायगड जिल्ह्यातील जंजिरा किल्ला असून तो लंडन येथील एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या घरी विकल्या गेला आहे.