सिंदखेड राजा ते शेगाव भक्तिमार्ग तयार करा ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ♦️शेतकऱ्याची मागणी ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ♦️महामार्गासाठी शेतजमीन देण्यास शेतकरी तयार ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, लोकदर्शन देऊळगाव राजा👉 प्रा अशोक डोईफोडे

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन देऊळगाव राजा👉 प्रा अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
सिंदखेड राजा ते शेगाव तयार होणाऱ्या भक्तिमार्ग ला तालुक्यातील शेतकऱ्यांनी समर्थन देत विकासासाठी शेत जमीन देण्यास तयार असल्याचे निवेदन तहसिलदार वैशाली डोंगरजाल यांना दिले,
हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गावर असलेल्या राष्ट्रमाता मा जिजाऊ यांचे जन्म स्थान मातृतीर्थ सिंदखेडराजा ते तीर्थक्षेत्र शेगाव ला जोडणारा भक्तिमार्ग तयार करण्यास शासनाकडून मान्यता मिळाली आहे, त्यामुळे लाखो भाविकांना श्री संत गजानन महाराज व मां जीजाऊ यांचे दर्शन घेणे सुलभ होणार असल्याने भाविक भक्तांचा आनंद द्विगुणित झाला आहे, तेव्हा शासनाने त्वरित भूमी अधिग्रहण करून शेतकऱ्यांना समृध्दी महामार्गा प्रमाणे मोबदला वाटप करण्यात यावा व तात्काळ महामार्गाचे काम सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसिलदार यांचेकडे केली आहे, यावेळी शेतकरी सुभाष सवडे, शिवहरी बुरकुल, देविदास बुरकुल, बद्री डोके, दादाराव म्हस्के, कैलास सवडे, दगडुबा शेळके, साहेबराव खारडे, अशोक मांटे, बापूराव सवडे, प्रदीप बुरकुल, पांडुरंग जाधव, भगवान बोबले उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here