सावखेड भोई येथील स्वस्त धान्य दुकानदाराच्या मनमानी कारभारामुळे कार्डधारक राशन पासून वंचित* ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, *♦️कार्डधारकांनी घातला तहसीलदारांना घेराव* ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन.देऊळगाव राजा : 👉 प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
तालुक्यातील मौजे सावखेड भोई येथील स्वस्त धान्य दुकानदारांच्या मनमानी कारभामुळे कार्डधारकांना स्वस्त धान्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. स्वस्त धान्य दुकानदारांकडून त्यांना धान्य देण्यास टाळाटाळ होत असल्याने आज यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने वंचित कार्डधारकांना सोबत घेऊन तहसीलदार यांना घेराव घालून कार्डधारकांना तात्काळ राशन मिळावे. व स्वस्त धान्य दुकानदार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.
मागील एक ते दोन महिन्यांपासून सावखेड भोई येथील जवळपास 200 राशन कार्ड धारकांना धान्य वाटप करण्यात आलेले नाही. तसेच ई -पॉश मशीनद्वारे पावती देखील काढण्यात आलेली नाही. याबाबत कारधारकांनी स्वस्त धान्य दुकानदारास विचारले असता त्यानी शासकीय कोठे आलेला नाही मी तुम्हाला धान्य देऊ शकत नाही अशी उडवायची उत्तरे देऊन या कारधारकांना राशन पासून वंचित ठेवले आहे. या संदर्भात आज शेकडो कार्डधारकांसह राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेश इंगळे,जहीर पठाण, जना मगर यांनी तहसीलदारांच्या दालनात घेराव घातला. अचानक झालेल्या घेराव आंदोलनाने तहसील कार्यालय थोडा वेळ गोंधळ उडाला.दरम्यान कार्डधारकांना स्वस्त धान्य मिळत नसल्याबाबत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांसोबत चर्चा केली. यावेळी तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी सदर बाबीची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.तसेच कार्डधारकांना लवकरात लवकर धान्य वाटप करण्यात येईल व संबंधित स्वस्त धान्य दुकानदार यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here