ग्रामसेविका शुभांगी ढवळे यांना सन्मानाचा निरोप*

लोकदर्शन 👉 मोहन भारती

बाखर्डी :- गावाच्या शाश्वत विकासासाठी ग्रामसेवकाची भूमिका महत्त्वाची असते अश्याच एका कर्तव्यनिष्ठ ग्रामसेविकेचा निरोप सत्कार समारंभ ग्रामपंचायत निमणी व ग्रामस्थांनी घडवून आणला सतत ३ वर्ष सहा महिने निष्ठेने सेवा देणाऱ्या ग्रामसेविका शुभांगी ढवळे यांचा सत्कार सरपंच अतुल धोटे उपसरपंच शिल्पा जगताप माजी उपसरपंच उमेश राजूरकर तमुस अध्यक्ष अशोक झाडे यांनी शाल श्रीफळ साडी देऊन सत्कार करून त्यांनी केलेल्या कामाची पावती दिली.
या साडेतीन वर्षाच्या कार्यकाळात विविध लोकोपयोगी योजना राबवून गावाला प्रगतिपथावर नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला व निमणी ग्रामपंचायतला आय एस ओ मानांकन प्राप्त करून दिले.यासाठी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व गावकऱ्यांचे सहकार्य लाभल्याचे ग्रामसेविका शुभांगी ढवळे यांनी कबुली दिली.
याप्रसंगी नव्याने रुजू झालेले ग्रामसेवक सुभाष सारये यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रफुल काळे विलास कोंगरे ग्रामपंचायत सदस्य अनिल कारेकर पद्माकर पिदूरकर रामकृष्ण बंडेवार देवेंद्र ढवस ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा बांदूरकर संगीता बुरान मंजुळा आत्राम आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन उमेश राजूरकर तर आभार प्रफुल मोरे यांनी मानले यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here